७४ तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST2021-05-22T04:08:59+5:302021-05-22T04:08:59+5:30

काटाेल : टायगर ग्रुप व शेर शिवाजी संघटनेच्या वतीने येनवा (ता. काटाेल) येथील बाजार चाैकात डाॅ. जय गजभिये यांच्या ...

74 young people donated blood | ७४ तरुणांनी केले रक्तदान

७४ तरुणांनी केले रक्तदान

काटाेल : टायगर ग्रुप व शेर शिवाजी संघटनेच्या वतीने येनवा (ता. काटाेल) येथील बाजार चाैकात डाॅ. जय गजभिये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवारी (दि. २०) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ७४ तरुणांनी रक्तदान केले.

काेराेना संक्रमण काळात रक्ताची वाढती मागणी व निर्माण हाेणारा तुटवडा लक्षात घेता, या शिबिराचे आयाेजन करण्यात आल्याेचही आयाेजकांनी स्पष्ट केले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. पराग नारखेडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राहुल वाघमारे, शेर शिवाजी संघटनेचे अध्यक्ष भूषण पुंड, आकाश राऊत, तालुका अध्यक्ष मिथुन उमप, नीलेश नगरकर, अमित पळसापुरे, टायगर ग्रुपचे रजत वाघमारे, अंकुश नगरकर, रोशन उमप, मंगेश माळवी, कृष्णा लंगोटे, जय ठाकरे, रोशन मते, भूषण ठाकरे, प्रतीक धोटे, शुभम थोटे, हर्षल ठोळे, पंकज पाचपोहर, भूषण वाघ, नीलेश लाडे, नानू वाघ, अतुल पाचपोहर, प्रवीण कांबळे, रोशन लाडे, चंद्रशेखर ठाकरे, चेतन ठाकरे, मनीष बावणे, चेतन बोरकर, गौरव लाडे, राहुल लाडे उपस्थित होते.

Web Title: 74 young people donated blood