शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खत-बियाण्यांच्या तपासणीसाठी नागपूर विभागात ७० पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकासंबंधी कुठलीही तक्रार आढळल्यास पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागपूर विभागांतर्गत ...

ठळक मुद्देजिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कामकाज पाहतील

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकासंबंधी कुठलीही तक्रार आढळल्यास पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागपूर विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात १५, वर्धा जिल्ह्यात ९, भंडारा येथे ८, गोंदिया येथे ९, चंद्रपूर येथे १६ तसेच गडचिरोली येथे १३ पथके तयार करण्यात आली आहेत. विभागस्तरावर तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) वाय. एस. जुमडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी पथकाचे कामकाज पाहतील.अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार विक्रेत्यांनी दरफलक व साठाफलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे, वैध मुदतीतील बियाणे विक्री करणे, जास्त दराने बियाणे व खते विकणाऱ्या  दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल मागणे आदी बाबींवर शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. बियाणे व खतांच्या बॅगवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत घेत असल्याची, विशिष्ट कंपनीचे बियाणे व खते घेण्यास बाध्य करणे, उपलब्धता नसणे, गुणवत्तेबाबत शेतकरी कुठल्याही प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तसेच विभागीय स्तरावरील तंत्र अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात.विक्रेत्यांनी पाकीट व बॅगवरील माहिती बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करूनच विक्री करावी. माल विक्रीच्या वेळी पक्के बिल द्यावे, बिलावर शेतकºयांचे नाव, निविष्ठेचे नाव, कंपनीचे नाव, लॉट नंबर, बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद करावी.येथे करा तक्रारशेतकरी तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० तसेच विभागस्तर ०७१२-२५५९८१५, ९८३४८८६६२४, जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, नागपूर ९५२७८६६६७५, कृषी विकास अधिकारी वर्धा ९४२३८९१४४५, कृषी विकास अधिकारी भंडारा ९६३७१८६७०४, कृषी विकास अधिकारी गोंदिया ९४२०८०६४३०, कृषी विकास अधिकारी चंद्रपूर ९४०४८१०३५८ तसेच कृषी विकास अधिकारी गडचिरोली ९४२२२७७४२१ वर संपर्क साधू शकतात, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर