चौथ्या दिवशी ६७ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:01+5:302021-01-22T04:09:01+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या चौथ्या दिवशीचे चित्र समाधानकारक होते. ६७.९७ टक्के लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मनपाच्या पाचपावली ...

चौथ्या दिवशी ६७ टक्के लसीकरण
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या चौथ्या दिवशीचे चित्र समाधानकारक होते. ६७.९७ टक्के लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मनपाच्या पाचपावली लसीकरण केंद्रावर १०२ टक्के, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रावर १०० टक्के लसीकरण झाले. सर्वांत कमी लसीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) केंद्रावर झाले.
शासनाच्या निर्णयानुसार नागपूर ग्रामीणमध्ये मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार याच दिवशी लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज ग्रामीण भागातील सातही केंद्रांवर लसीकरण बंद होते. मात्र, शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. ‘एम्स’ला १०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांनी ते पूर्ण केले. मेडिकलला दिलेल्या १०० टक्के लसीकरणाच्या लक्ष्यामध्ये २१ टक्केच लसीकरण झाले. डागा रुग्णालयाच्या केंद्रावर १००पैकी ४० टक्के, मेयोमध्ये १००पैकी ७५ टक्के, तर पाचपावली केंद्रावर १०० टक्केपैकी १०२ टक्के लसीकरण झाले.
-मेडिकलच्या कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद
मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर आज मेडिकलच्याच कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार होती. त्यानुसार १०० कर्मचाऱ्यांची यादी आली. परंतु यातील २१ कर्मचारी लसीकरणासाठी पुढे आले. मेडिकलमध्ये वरिष्ठ डॉक्टरांपासून ते परिचारिकांनी लस घेतली असताना कर्मचारी मागे राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्रलक्ष्य लसीकरण
एम्स १०० १००
मेडिकल १०० २१
डागा १०० ४०
मेयो १०० ७५
पाचपावली १०० १०२
एकूण ५०० ३३८