६५९ रेतीसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:16+5:302020-12-02T04:10:16+5:30
सावनेर/पाटणसावंगी : महसूल विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील खापा नजीकच्या करजघाट परिसरात धाड टाकून १,८७० घनमीटर अर्थात ६५९ ब्रास रेतीसाठा ...

६५९ रेतीसाठा हस्तगत
सावनेर/पाटणसावंगी : महसूल विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील खापा नजीकच्या करजघाट परिसरात धाड टाकून १,८७० घनमीटर अर्थात ६५९ ब्रास रेतीसाठा आणि दाेन पाेकलॅण्ड मशीन असा एकूण ६८ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. रेतीसाठा असलेल्या जागेच्यसा मालकाला कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे, अशी माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. २८) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
‘लाेकमत’मध्ये शनिवारी (दि. २८) ‘कन्हान नदीवरील घाट तस्करांचे टार्गेट’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाच्या पथकाने कन्हान नदीवरील काही रेतीघाटांची तातडीचे पाहणी केली. यात त्यांना खापा नजीकच्या करजघाट या रेतीघाटालगतच्या जमिनीवर माेठ्या प्रमाणात रेतीचा साठा केल्याचे आढळून आले. ताे रेतीसाठा अवैध असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, त्यांनी ताे ताब्यात घेतला. यात १३ लाख रुपयांची ६५९ ब्रास रेती आणि ५५ लाख ५३ हजार ६०० रुपये किंमतीच्या दाेन पाेकलॅण्ड मशीन असा एकूण ६८ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली. या प्रकरणात तूर्तास कुणावरही दंडात्मक कारवाई अथवा फाैजदारी गुन्हा दाखल केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...
अमित राॅय यांना ‘शाे काॅज नाेटीस’
हा रेतीसाठा अमित लेखराज राॅय, रा. खापा यांच्या मालकीच्या जागेवर असल्याने त्यांना ‘शाे काॅज नाेटीस’ बजावून २४ तासात उत्तर मागितले आहे. यातील थाेडी रेती ही मातीमिश्रीत आहे तर बहुतांश नदीच्या पात्रातील ‘फ्रेश’ रेती आहे, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हा साठा सर्व्हे क्रमांक-२२ मधील ०.४० आर जागेवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
विधान परिषद निवडणुकीमुळे शेत अथवा नदीकाठच्या जागेवरील मातीमिश्रीत रेतीची उचल करण्याची कुणालाही परवानगी दिली नाही. रेतीघाटांचे लिलावही झाले नाहीत. त्यामुळे हा रेतीसाठा अवैध आहे. अमित राॅय यांना कारण दाखवानाेटीस बजावली असून, त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर याेग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रताप वाघमारे,
तहसीलदार, सावनेर.