६५ कामगारांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:12+5:302021-03-15T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माेहपा : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक अप्रेंटिस व कंत्राटी कामगार असोसिएशन, नागपूर आणि ...

६५ कामगारांनी केले रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
माेहपा : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक अप्रेंटिस व कंत्राटी कामगार असोसिएशन, नागपूर आणि नागपूर येथील साईनाथ रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने माेहपानजीकच्या म्हसेपठार (ता. कळमेश्वर) येथील भारती महाराज देवस्थानच्या सभागृहात शनिवारी (दि. १३) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात ६५ कामगारांनी रक्तदान केले.
काेराेना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती आयाेजकांनी दिली. या शिबिराचे उद्घाटन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्की कावळे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष किशोर फाले, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महंत, राज्य उपाध्यक्ष प्रशांत ननोरे, कोषाध्यक्ष किरण कऱ्हाळे, म्हसेपठारचे सरपंच संजय कुबडे, राजकुमार देशमुख, कुणाल जिचकार, परमानंद बनगय्या, किशोर ढाले, किशोर भुजाडे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी दिनेश काळे, प्रतीक रेवतकर, महेंद्र कावडकर, तुषार पराते, मंगेश चिमोटे, उमेश होले, मनोज उपासे, सौरव गणोरकर, सतीश मेंगर, चंद्रशेखर बनारसी यांनी सहकार्य केले.