लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे.मेट्रो स्टेशनवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनल दिसायला आकर्षक दिसत आहे. एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी या तिन्ही स्टेशनवर सोलर पॅनल लावण्याचे कार्य पूर्ण झाले असून सोलर पॅनलचा उपयोग होत आहे. उर्वरित ऊर्जेचा साठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला वितरित करीत आहेत. यामुळे गेल्या चार महिन्यात आर्थिक आणि पाण्याची बचत महामेट्रोने केली आहे.मेड इन इंडिया अंतर्गत संपूर्ण सोलर पॅनल भारतातच तयार करण्यात आले आहे. तिन्ही स्टेशनवर ९६२ सोलर पॅनल लावण्यात आले आहे. यामुळे ३१२ किलोवॅट ऊर्जा मिळत आहे. सोलर पॅनलमुळे दिवसभर तिन्ही स्टेशनला विद्युत पुरवठा होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सरप्लस ऊर्जा मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी उपयोगी पडत आहे. सोलर पॅनलच्या देखरेखीसाठी कोणताही अतिरिक्त खर्च महामेट्रोला करावा लागणार नाही. यामुळे नागपुरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लावण्यात आलेले सोलर पॅनल पूर्णपणे फायदेशीर ठरत आहे.
मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:39 IST
मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे.
मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जा
ठळक मुद्देमेट्रो रेल्वे चालविण्यासाठी उपयोग : ९६२ सोलर पॅनल