शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

'डीप पीट अ‍ॅण्ड फिशर'चे ६५ रुग्ण : नागपूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:02 PM

मुलांचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘पीट अ‍ॅण्ड फिशर सीलेंट’ हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व डेंटलचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांच्या पहिल्या पक्क्या दाढेवर उभ्या रेषा व खड्डे असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘डीप पीट अ‍ॅण्ट फिशर’ म्हटले जाते. यात अन्नकण अडकून पुढे कीड लागण्याची शक्यता अधिक असते. मुलांचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘पीट अ‍ॅण्ड फिशर सीलेंट’ हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. यात एका शाळेतील १२० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ‘डीप पीट अ‍ॅण्ड फिशर’चे ६५ विद्यार्थी आढळून आले, हे विशेष.मुलाचे दात वयाच्या सहाव्या महिन्यात निघायला सुरुवात होते तर सहाव्या वर्षी पहिली पक्की दाढ यायला सुरुवात होते. दाढ नवीन असल्याने कमजोर असते. ही दाढ तोंडात शेवटी असते. यामुळे ब्रश करताना त्या दाढेपर्यंत जात नाही. त्यामुळे दातावरील अन्नकण निघत नाही. या दाढीच्या पृष्ठभागावर दोन खोल खड्डे व उभ्या लाईन असतात. यात अन्नकण अडकून दात किडण्याची शक्यता असते. यावर कवच म्हणजे ‘पिट अ‍ॅण्ड फिशर सीलेंट’ लावले जाते. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर ‘पिट अ‍ॅण्ड फिशर सीलेंट’ कार्यक्रम राबविणे हाती घेतले आहे. याची सुरुवात १० फेब्रुवारी रोजी विवेकानंद नगर येथील हिंदी प्राथमिक शाळेतून करण्यात आली. याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिक्तिसक डॉ. देवेंद्र पातुरकर, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक, विभाग प्रमुख डॉ. रितेश कळसकर, जिल्हा मुख्य आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. दातिरा इकबाल, डॉ. सचिन खत्री व डॉ. विनोद पाकदूने आदी उपस्थित होते. यावेळी १२० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात ६५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या पक्क्या दाढेवर ‘डीप पीट अ‍ॅण्ट फिशर’ आढळून आले. यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व समोर आले. यामुळे आता इतरही शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कळसकर म्हणाले, ‘पीट अ‍ॅण्ड फिशर सीलेंट’ लावण्यासाठी पालकांचे संमती पत्रक आवश्यक आहे. ते मिळाल्यावरच बाल दंतरोगशास्त्र विभाग व सामाजिक दंतशास्त्र विभागाची चमू संबंधित शाळेत जाऊन मुलांच्या दाढेवर ते बसवेल.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर