शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास'

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 23:59 IST

वार्षिक उत्पन्न २१९ टक्क्यांनी वाढले : सद्य:स्थितीत १० कोटींहून अधिक संपत्ती

नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे विकास ठाकरे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. २०१९ मध्ये ठाकरे यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२४ या साडेचार वर्षांच्या कालावधीत ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नी मिळून एकूण ६ कोटी १८ लाख ११ हजार ३३० रुपयांची एकूण संपत्ती होती. त्यात १ कोटी ४८ लाख ११ हजार ३३० रुपयांची चल संपत्ती व ४ कोटी ७० लाखांच्या अचल संपत्तीचा समावेश होता. २०१९ पासून ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी विकास ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार ठाकरे व त्यांच्या पत्नी वृंदा यांच्या नावे मिळून एकूण २ कोटी ७१ लाख ७४ हजार ८१४ अधिकची चल संपत्ती आहे, तर ७ कोटी ३५ लाख ८१ हजार ६६७ रुपयांची अचल संपत्ती आहे. अचल संपत्तीमध्ये वानाडोंगरीत २.७९ एकर तसेच जून २०२३ मध्ये खरेदी केलेली ०.३३७ हेक्टर इतकी शेतजमीन, हिंगण्यातील मौजा नीलडोह येथे ५ हजार चौरस फुटांचा भूखंड, मौजा परसोडी येथे १४६४.५ व १६१४.५८ चौरस फुटांचा भूखंड, मौजा दाभा येथे हजार फुटांचा भूखंड, मौजा परसोडी शास्त्री लेआऊट येथील घर यांचा समावेश आहे.ठाकरे व त्यांच्या पत्नीवर २ कोटी ९२ लाख ५८ हजार ६९ रुपयांचे कर्ज आहे. केवळ विकास ठाकरे यांच्याकडे १ कोटी २९ लाख ६५ हजार १८५ रुपयांची अचल संपत्ती व ६९ लाख १० हजार रुपयांची चल संपत्ती आहे.

- वार्षिक उत्पन्नात तिपटीने वाढ२०१८-१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न १५ लाख ७६ हजार ६६ इतके होते. २०२२-२३ मध्ये उत्पन्नाचा आकडा ५० लाख ३२ हजार ९३० इतक्यावर पोहोचला. साडेचार वर्षांतच वार्षिक उत्पन्नात २१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- दीड वर्षाअगोदर घेतली नवीन कारशपथपत्रातील माहितीनुसार, ठाकरे व त्यांच्या पत्नीकडे मिळून १ कोटी ४८ लाख ११ हजार ३३० रुपयांची चल संपत्ती आहे. त्यात ५३.४ तोळे सोन्याचे दागिने व ५.०२ किलो चांदीचे दागिने, १ कोटी २ लाख ५२ हजारांची वाहने आहेत. त्यातील ७२ लाखांची कार विकास ठाकरे यांच्या नावावर जुलै २०२२ मध्ये विकत घेण्यात आली.

- कर्जाचा आकडादेखील वाढला२०१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नीच्या नावावर ८७ लाख २१ हजार ८४९ रुपयांचे कर्ज होते. साडेचार वर्षांत संपत्तीप्रमाणे कर्जाचा आकडादेखील वाढला असून, सद्य:स्थितीत त्यांच्यावर २ कोटी ९२ लाख ५८ हजार ०६९ इतक्या रकमेचे कर्ज आहे.

-चार न्यायालयीन प्रकरणेदरम्यान, ठाकरे यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. या प्रकरणात न्यायालयीन खटले सुरू आहेत. २०१४ साली हाच आकडा २५ इतका होता.

- ठाकरेंची संपत्तीवर्ष : चल संपत्ती : अचल संपत्ती : कर्ज२०१९ : १,४८,११,३३० : ४,७०,००,००० : ८७,२१,८४९२०२४ : २,७१,७४,८१४ : ७,३५,८१,६६७ : २,९२,५८,०६९

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vikas Thackreyविकास ठाकरे