शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:54 IST

शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती दीक्षाभूमी ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी व आकर्षक रोषणाईने अवघी दीक्षाभूमी सजत आहे. मंगळवारी पंचशीलचा ध्वज खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरू होते.

ठळक मुद्देनिळ्या पाखरांनी फुलत आहे दीक्षाभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती दीक्षाभूमी ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी व आकर्षक रोषणाईने अवघी दीक्षाभूमी सजत आहे. मंगळवारी पंचशीलचा ध्वज खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरू होते.दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी ही निळ्या पाखरांनी आणि पंचशील ध्वजाने सजते. या वर्षीही जागोजागी धम्मध्वज लावले जात आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशीलला अनुसरून असलेला हा पंचशील ध्वज स्तूपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तूपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले जात आहे. या दिनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सोर्इंची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी उभारण्यात येणारे भव्य धम्ममंच, पंचशीलचे झेंडे व आकर्षक रोषणाईच्या कामासाठी आंबेडकरी चळवळीतीलच कार्यकर्ते सतत झटत आहेत.२४ तास पिण्याचे पाणीदीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कायमस्वरुपी नळांना २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.सफाईची जबाबदारी ९०० कर्मचाऱ्यांवर१८ व १९ आॅक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरुपाची शौचालय व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी व महानगर पालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.आरोग्याची विशेष काळजीदीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी विविध वैद्यकीय संघटनांनी घेतली आहे. माता कचेरी परिसरात तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहे. महानगर पालिका, आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने हे काम करेल. मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. चार मोबाईल रुग्णवाहिका काचीपुरा पोलीस चौकी, बजाजनगर पोलीस चौक, तसेच लक्ष्मीनगर चौकी जवळ उपलब्ध असील. 

आज धम्मपरिषद व संविधानाचा जागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर सुरु असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या अंतर्गत १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते करण्यात येईल. या परिषदेला जपान, थायलँड, मलेशिया, म्यानमार आदींसह देशविदेशातील प्रतिनिधी सहभागी होतील.  यानंतर रात्री ९ वाजता अश्वघोष आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल फाऊंडेशन कोल्हापूरतर्फे संविधानाचा जागर हा संगीतमय कार्यक्रम होईल.  तत्पूर्वी बुधवारी सकाळी ९ वाजता स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी समितीचे सदस्य ना.रा. सुटे, अ‍ॅड. आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले प्रामुख्यने उपस्थित राहतील. 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर