६१वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:52 IST2017-09-30T01:52:00+5:302017-09-30T01:52:23+5:30
शोषित, पीडितांना ज्या बाबासाहेबांनी निर्भय श्वास दिला, पाठीवर कणखर ठेवला. धर्म, जाती, पंथाची शृंखला तोडत शांतीने, प्रेमाने माणसे जोडली.

६१वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा आज
ठळक मुद्देतुझेच धम्मचक्र फिरे जगावरी...
शोषित, पीडितांना ज्या बाबासाहेबांनी निर्भय श्वास दिला, पाठीवर कणखर ठेवला. धर्म, जाती, पंथाची शृंखला तोडत शांतीने, प्रेमाने माणसे जोडली. त्या अतुलनीय कार्याचे स्मरण राहावे आणि धम्मचक्र अविरत फिरावे यासाठी नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होतो. यानिमित्ताने देश-विदेशातील हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर एकवटले आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने या ठिकाणी ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.