लोकमत न्यूज नेटवर्क
मौदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अराेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर नदीपात्रात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. यात एकूण ६ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी गस्तीवर असताना त्यांनी सूर नदीच्या पात्रात पाहणी केली असता, एमएच-४०/बीजे-७४५२ क्रमांकाचा ट्रॅक्टर व एमएच-४०/एएम-२००९ क्रमांकाच्या ट्राॅलीमध्ये रेतीची विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करताना आढळून आले. सदर ट्रॅक्टर आणि एक ब्रास रेती असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मते यांच्या तक्रारीवरून अराेली पाेलिसांनी प्रशांत चुडामण झुंझाड (३५), राजेंद्र मनाेहर रामटेके (२८), असलम रशिद झाडीये (२७) व आनंदराव चिंधूजी बांते (४८) सर्व रा. पिंपळगाव, ता. माैदा यांच्याविरुद्ध अराेली पाेलीस ठाण्यात भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस नाईक राजेंद्र पुडके करीत आहेत.