शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन आहे अतिक्रमणाच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:29 IST

Nagpur : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाजवळ आहे ९८ हजार ७०० एकर जमीन

रियाज अहमद लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: संसदेत वक्फ बोर्ड संशोधन बिलावर मंथन सुरू आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे, एका सर्वेत ही माहिती पुढे आली आहे. या जमिनीला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी फारशी प्रभावी कारवाई झालेली नाही. 

या जागेसाठी आहे वादनागपूरमध्ये वक्फच्या विविध संपत्तींचा वाद चर्चेत आहे. यातील एक प्रकरण सदरमधील एका अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या मैदानाशी जुळला आहे. याशिवाय सतरंजीपुरा मस्जिद कमिटीच्या गोधनी येथील जमिनीचे प्रकरणही चर्चेत आहे. सन २०१६-१७ दरम्यान राज्यातील वक्फ बोर्डाने ताजाबाद दर्गाहची जमीन वक्फची असल्याचा दावा केला होता. हे प्रकरणही बरेच चर्चेत आले होते. नागपुरातील वक्फ बोर्ड कार्यालयात वक्फ संपत्तीच्या नोंदणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत.

छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक मालमत्तावक्फजवळ असलेल्या एकूण जमिनीपैकी सर्वाधिक ५० टक्के जमीन मराठवाड्यात आहे. त्यातही सर्वाधिक संपत्ती छत्रपती संभाजीनगरात असल्याची माहिती सर्व्हेत नोंदवली आहे. त्यानंतर बीड, जालना आणि परभणीतही मोठी संपत्ती वक्फकडे आहे. विदर्भात केवळ नागपूर आणि अमरावतीतच वक्फकडे जमीन आहे. नागपूर शहर आणि जिल्हा मिळून सुमारे ४० ते ५० एकर जमीन वक्फकडे आहे. 

गेल्यावर्षी झाला होता सव्हेंराज्य वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या पुढाकाराने गेल्यावर्षी राज्यात वक्फच्या जमिनीसंबंधाने एक महत्त्वपूर्ण सर्व्हे करण्यात आला होता. त्याचा अहवाल वक्फकडे सुरक्षित आहे. सर्व्हेनुसार, राज्यातील वक्फ बोर्डाजवळ असलेल्या जमिनीपैकी सुमारे ६० टक्के जमिनीवर अतिक्रमण आहे. सर्वाधिक अतिक्रमण मराठवाड्यातील जमिनीवर असल्याचा दावा सर्व्हेतून करण्यात आला होता.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डnagpurनागपूर