पतंजलीने भरले ५८.६३ कोटी
By Admin | Updated: August 31, 2016 02:24 IST2016-08-31T02:24:12+5:302016-08-31T02:24:12+5:30
रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने मिहानमधील फूड पार्कमध्ये २३० जागा निविदेद्वारे खरेदी केली आहे.

पतंजलीने भरले ५८.६३ कोटी
जागेचे लवकरच अधिग्रहण : ६४.९३ कोटींत जागेची खरेदी
नागपूर : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने मिहानमधील फूड पार्कमध्ये २३० जागा निविदेद्वारे खरेदी केली आहे. कंपनीने प्रारंभी ६.३० कोटी रुपये भरले होते. मंगळवारी ५८.६३ कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे मिहानमध्ये पतंजलीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. निविदेत पतंजलीला ६३० रुपये प्रति चौरस मीटर अर्थात २५.५० लाख रुपये एकर दराने एसईझेडबाहेरील फूड पार्कमध्ये २३० एकर अविकसित जागा मिळाली आहे. या जागेची एकूण किंमत ६४.९३ कोटी रुपये आहे. कंपनीला जागा विकसित करून त्यावर उद्योग सुरू करावा लागेल. अधिग्रहणानंतर जागेच्या विकासासाठी जवळपास एक वर्ष लागणार आहे.