आरटीईच्या प्रवेशासाठी ५,६११ बालकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:09+5:302021-04-16T04:08:09+5:30
नागपूर : गुरुवारी आरटीईचा ड्रॉ निघाला. यात ५,६११ मुलांची निवड झाली. निवड यादी आरटीईच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

आरटीईच्या प्रवेशासाठी ५,६११ बालकांची निवड
नागपूर : गुरुवारी आरटीईचा ड्रॉ निघाला. यात ५,६११ मुलांची निवड झाली. निवड यादी आरटीईच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ड्रॉमध्ये ज्या बालकांचा नंबर लागला आहे त्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस मिळणे सुरू झाले आहे.
ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पोर्टलवर तारीख प्रसिद्ध केली आहे. अर्जाच्या क्रमांकावरून कागदपत्र तपासणीच्या तारखेची माहिती मिळू शकते. कागदपत्राच्या तपासणीसाठी जी तारीख दिली आहे, त्याच तारखेत तपासणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर संबंधित शाळेच्या नावाने प्रवेशपत्र देण्यात येईल. प्रवेशपत्र व तपासण्यात आलेली कागदपत्रे शाळेत जमा केल्यानंतर प्रवेश निश्चित होईल.
- ५,७२९ जागा आरक्षित
जिल्ह्यात ६८० शाळांनी आरटीईच्या प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यानुसार ५,७२९ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २४,१६८ अर्ज आले होते. ड्रॉमध्ये ५,६११ बालकांची निवड झाली. पहिल्या राऊंडमध्ये शाळेपासून १ किलोमीटरच्या आत राहणाऱ्या बालकांना प्राथमिकता दिली आहे. प्रवेश न घेतल्यास बालकांना प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर करण्यात येईल. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांना संधी देण्यात येईल. एसएमएस मिळाल्यावर दिलेल्या तारखेत तपासणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करायची आहे.
- आरटीईचा ड्रॉ निघाला आहे. ज्या बालकांचा नंबर लागला आहे, त्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस येईल. कागदपत्रांच्या तपासणीची तारीख सांगण्यात येईल. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच संबंधित शाळेचे प्रवेशपत्र देण्यात येईल.
- चिंतामण वंजारी, शिक्षणधिकारी, जिल्हा परिषद