शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:00+5:302021-04-20T04:09:00+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा ...

56 in urban areas and 31 in rural areas | शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा हळूहळू शतकाजवळ पाेहाेचत असून, काेराेनाने आजवर तालुक्यातील ८७ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात काटाेल शहरातील ५६, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे काेराेना संक्रमण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. वेळीच चाचणी न करणे आणि आजारपण लपवून अंगावर काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. त्यामुळे संक्रमणाचा वेग कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आजवर ६,७२६ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात २,९७३ नागरिक काटाेल शहरातील व २,७५३ नागरिक तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. यातील ४,२७८ रुग्णांनी काेराेनावर समर्थपणे मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये २,७३२ रुग्ण काटाेल शहरातील, तर १,५४६ रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. सध्या १,१८५ शहरी व १,१७६ ग्रामीण भागातील अशा एकूण २,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काेराेना संक्रमणाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने लसीकरण माेहीम युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली. तालुक्यात आजवर ३३,८१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १०,३२३ काटाेल शहरातील तर २३,४९३ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वांनी स्वतःच्या पातळीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन व्यवहार करावे, असे आवाहन आपत्ती निवारण समिती प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डॉक्टर शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश डवरे, शिक्षणाधिकारी दिनेश धवड, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके यांनी केले आहे.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

एकीकडे काेराेना संक्रमण आणि त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे प्रशासनाची हतबलता आणि नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असून, अख्ख कुटुंब आणि गाव संक्रमित हाेत आहे. वारंवार सूचना देऊन, आवाहन करूनही नागरिक आठवडी बाजार भरवणे, राेडवर विनाकारण फिरणे, गर्दी करणे, कुठेही थुंकणे, मास्क न वापरणे यांसारख्या साध्या बाबींवर नागरिक अंमल करायला तयार नाही.

Web Title: 56 in urban areas and 31 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.