मास्क न वापरणाऱ्या ५६ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST2021-03-23T04:08:09+5:302021-03-23T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५६ नागरिकांविरुध्द कारवाई केली. ...

56 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या ५६ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या ५६ नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५६ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,३९५ नागरिकांविरुध्द कारवाई करून १ कोटी ६५ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १८, हनुमाननगर झोन ३, धंतोली ७, नेहरुनगर ६, गांधीबाग ३, सतरंजीपुरा ४, लकडगंज ३, आशीनगर ८, मंगळवारी झोन अंतर्गत ४ जणांवर ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Web Title: 56 citizens fined for not wearing masks