काटाेल तालुक्यात २३ जागांसाठी ५५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST2020-12-31T04:10:24+5:302020-12-31T04:10:24+5:30

काटाेल : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील २३ जागांसाठी एकूण ५५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात शेवटच्या दिवशी दाखल ...

55 applications for 23 seats in Katail taluka | काटाेल तालुक्यात २३ जागांसाठी ५५ अर्ज

काटाेल तालुक्यात २३ जागांसाठी ५५ अर्ज

काटाेल : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील २३ जागांसाठी एकूण ५५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या २२ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली हाेती. त्यामुळे त्यांना वेळेची मुभा देण्यात आली हाेती.

तालुक्यातील खंडाळा (खुर्द) येथे ७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, भाेरगड येथे ७ जागांसाठी १८ तर माळेगाव येथे ९ जागांसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही ठिकाणी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार असून, सर्वच राजकीय पक्ष समर्थित गटांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील खरे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

Web Title: 55 applications for 23 seats in Katail taluka