५४ टक्के उमेदवार गैरहजर
By Admin | Updated: June 30, 2014 00:49 IST2014-06-30T00:49:30+5:302014-06-30T00:49:30+5:30
तंत्रज्ञ आणि सहायक लोकोपायलट पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या रेल्वेच्या परीक्षेत १५ हजार २६४ उमेदवारांपैकी फक्त ७ हजार १६५ उमेदवारांनीच हजेरी लावली. यात ८ हजार ९९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली.

५४ टक्के उमेदवार गैरहजर
परीक्षेकडे उमेदवारांची पाठ
नागपूर : तंत्रज्ञ आणि सहायक लोकोपायलट पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या रेल्वेच्या परीक्षेत १५ हजार २६४ उमेदवारांपैकी फक्त ७ हजार १६५ उमेदवारांनीच हजेरी लावली. यात ८ हजार ९९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. दरम्यान रविवारी दुपारी पुन्हा परीक्षार्थींचे लोंढे रेल्वेस्थानकाकडे परतल्यामुळे रेल्वेस्थानकावर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र दृष्टीस पडले.
बिलासपूर रेल्वे भरती बोर्डाच्यावतीने नागपुरात रविवारी तंत्रज्ञ आणि सहायक लोकोपायलट परीक्षेसाठी लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. परीक्षेसाठी एकूण १५ हजार २६४ उमेदवारांचे अर्ज आले होते. यात शनिवारीच हजारो उमेदवार परीक्षेसाठी दाखल झाले आणि त्यांनी रेल्वेस्थानक परिसरातच आपला मुक्काम ठोकला होता. रविवारी सकाळी १०.३० वाजता हे उमेदवार आपापल्या परीक्षा केंद्राकडे परीक्षा देण्यासाठी निघून गेले.
शहरातील ४० केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अर्ज आलेल्या उमेदवारांपैकी केवळ ७ हजार १६५ उमेदवारांनीच हजेरी लावली. यात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची टक्केवारी ४६.९४ एवढीच होती.
यातील ८ हजार ९९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. दरम्यान रविवारी दुपारी परीक्षा आटोपल्यानंतर उमेदवारांचे लोंढे पुन्हा रेल्वेस्थानकावर परतले. परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी पुन्हा रेल्वेस्थानक परिसरात जागा मिळेल तेथे अंथरुण टाकून विसावा घेतला. रात्री उशिरापर्यंत हे उमेदवार नागपूर (प्रतिनिधी)