शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची ५२७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:51 IST

सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी योजना, अंशदान पेन्शन योजना खात्यात जमा न केलेली रक्कम आणि महागाई भत्ता अशी जवळपास ५२७ कोटींची नागपूर महापालिकेतील थकबाकी आहे.

ठळक मुद्देभविष्य निर्वाह निधीचे ५३ तर अंशदान पेन्शनचेही ७४ कोटी थकीत

गणेश हूड।

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील आठ हजार शिक्षक व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी योजना, अंशदान पेन्शन योजना खात्यात जमा न केलेली रक्कम आणि महागाई भत्ता अशी जवळपास ५२७ कोटींची थकबाकी आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली, परंतु न्याय मिळालेला नाही. ही थकबाकी केव्हा मिळणार, असा प्रश्न कर्मचारी व शिक्षकांना पडला आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती करताना वेतन आयोगाची थकबाकी मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ही रक्कम १५० कोटीची आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. या वेतन आयोगाची थकबाकी २०० कोटींच्या जवळपास आहे. राज्य शासनाने महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. नासुप्र, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. मात्र महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही. महापालिका सभागृहात सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारनेही वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली होती. परंतु लगेच हा निर्णय रद्द करून आर्थिक स्थितीची माहिती मागितली होती. परंतु महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, यावर शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे.

महागाई भत्त्याचे ५० कोटी अडकलेमहापालिका कर्मचाऱ्यांचा ८४ महिन्यांचा महागाई भत्ता थकीत आहे. यातील प्रति कर्मचारी २४ हजार रुपये आतापर्यंत देण्यात आले आहेत. परंतु त्यानंतरही ५० कोटींची रक्कम अजूनही थकीत आहे. मागील काही वर्षांपासून कर्मचारी थकीत महागाई भत्त्याची मागणी करीत आहेत.

अंशदान पेन्शन योजनेचे ७३ कोटी थकलेशासकीय सेवेत २००५ सालानंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना आहे. परंतु या कर्मचाऱ्यांसाठी अंशदान पेन्शन योजना सुरू केली आहे. यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के तर तितकाच वाटा महापालिकेला द्यावयाचा आहे. मात्र महापालिकेने मागील काही वर्षांत ही रक्कम जमा केलेली नाही. जवळपास ६७४ कोटींची ही थकबाकी आहे.

पीएफचे ५३ कोटी जमा केले नाहीमहापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५३ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही. रक्कम जमा होत नसल्याने कर्मचारी व शिक्षकांना २०१७ सालापासून कर्मचारी व शिक्षकांना त्यांच्या खात्यात भविष्य निधीची रक्कम वळती केल्याच्या पावत्या मिळालेल्या नाही.

राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व महागाई भत्ता मिळोलला नाही. शासन निर्णयानुसारच आमची मागणी आहे. हा शिक्षकांचा हक्काचा पैसा आहे- राजेश गवरे, अध्यक्षमनपा शिक्षक संघ

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता मिळावा, यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १९ डिसेंबरला मनपा कर्मचारी संघटनेतर्फे पुन्हा आंदोलन करू.- सुरेंद्र टिंगणे,अध्यक्ष, मनपा एम्प्लॉईज असोसिएशन

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका