चार वर्षांत ५२२ मृत्यू
By Admin | Updated: June 26, 2014 00:48 IST2014-06-26T00:48:30+5:302014-06-26T00:48:30+5:30
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांपैकी एक मानण्यात येणारा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’ अपघातमार्ग झाला आहे. २०१० सालापासून या मार्गावर छोटे-मोठे मिळून १ हजार ६७७ अपघात झाले

चार वर्षांत ५२२ मृत्यू
मुंबई-पुणे मार्ग बनला मृत्यूचा ‘एक्स्प्रेस-वे’: १६७७ अपघातांची नोंद
नागपूर : देशातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांपैकी एक मानण्यात येणारा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’ अपघातमार्ग झाला आहे. २०१० सालापासून या मार्गावर छोटे-मोठे मिळून १ हजार ६७७ अपघात झाले असून ५२२ व्यक्तींना या अपघातांत जीव गमावावा लागला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर किती अपघात झाले, त्यात किती लोक मृत्युमुखी पडले व जखमी झाले यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस विभागाला विचारणा केली होती. यासंदर्भात अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्ष २०१० ते एप्रिल २०१४ या कालावधीत एकूण १, ६७७ अपघात झाले. यात एकूण ५२२ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुरुषांचा आकडा हा ४२८ इतका आहे.
४ वर्षांहून अधिकच्या काळात या ‘एक्स्प्रेस वे’वर झालेल्या ३७० अपघातांमध्ये ९१२ नागरिक गंभीर जखमी झाले. तर १२३ अपघातांमध्ये १९९ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती शासकीय म् ााहिती अधिकारी व पोलीस निरीक्षक डी.एम.बनसोडे यांनी दिली आहे.
या संपूर्ण कालावधीत ७७७ अपघात असेदेखील झाले ज्यात कोणीही जखमी झाले नाहीत. दरम्यान या अपघातांसाठी दोषी असलेल्यांपैकी किती जण दोषी ठरले याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त व रायगड-पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे असल्याचे उत्तर माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. (प्रतिनिधी)