शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नागपूर शहरातील वीज ग्राहकांवर ५१ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:21 IST

शहरात ३५,५९५ वीज ग्राहकांवर ५१.०८ कोटी रुपयाचे बिल थकीत आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने थकबाकीदारांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्दे१२,६१६ ग्राहकांनी वर्षभरापासून भरले नाहीत ३६.८५ कोटी

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ३५,५९५ वीज ग्राहकांवर ५१.०८ कोटी रुपयाचे बिल थकीत आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने थकबाकीदारांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत थकीत बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. एसएनडीएलच्या क्षेत्रात एकूण ५ लाख ५५ हजार ग्राहक आहेत. यापैकी ३५,५९५ ग्राहकांनी गल्या तीन महिन्यांंपासून आपले वीज बिल भरलेले नाही. एकीकडे पायाभूत विकासासाठी निधी कमी पडत आहे, तर दुसरीकडे थकीत बिल वाढून ५१.८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एसएनडीएलच्या आकडेवारीनुसार १२,१०३ ग्राहकांनी ३ महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंतचे वीज बिल भरलेले नाही. अशा ग्राहकांवर ३.८४ कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. तसेच १०,८७६ ग्राहकांनी सहा महिन्यांपासून एक वर्षापर्यंत १०.३९ कोटी रुपये भरलेले नाही. तर १२६१६ ग्राहकांनी तब्बल वर्षभरापासून वीज बिल भरलेले नाही. अशा ग्राहकांवर ३६.८५ कोटी रुपये थकीत आहे. एसएनडीएलने या ग्राहकांकडून वसुलीसाठी सर्व झोनमध्ये विशेष चमू गठित केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, वसुलीसाठी पोलिसांची मदतसुद्धा घेतली जाणार आहे. थकीत बिलामुळे एखाद्याची वीज कापण्यात आली, आणि त्याला शेजाऱ्याने वीज कनेक्शन दिले तर त्याच्याविरुद्ध सुद्धा इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल. त्याचप्रकारे जर परिसरात दोन कनेक्शन आहे. तो थकीत रकमेलाही दुसºया कनेक्शनवर ट्रान्सफर केले जाईल. त्याचप्रकारे थकबाकीदरांची संपत्तीही संलग्नित करण्याचा विचार केला जात आहे.

उच्चभ्रू परिसरातही सारखीच समस्यासाधारणपणे वीज बिल केवळ झोपडपट्टीतील ग्राहक थकवित असल्याची धारणा आहे. परंतु एसएनडीएलच्या आकडेवारीनुसार शहरातील उच्चभ्रू परिसरातही सारखीच समस्या आहे. या परिसरातील वीज ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणावर बिल थकविले आहे.उदाहरणार्थ धरमपेठ परिसरातील ३०० ग्राहकांवर १९ लाख रुपये थकीत आहे. जरीपटक्यातील १५९४ ग्राहकांवर २.३२ कोटी, गोविंद भवन येथील ६४२ ग्राहकांवर ५६ लाख, कामठी रोड २४८३ ग्राहकांवर ४.४४ कोटी, काटोल रोडच्या १४९४ ग्राहकांवर १.१० कोटी, लष्करीबाग येथील १३४९ ग्राहकांवर ३.३८ कोटी, मानकापूर येथील १३१४ ग्राहकांवर १.१४ कोटी नारातील १९९५ ग्राहकांवर २.०१ कोटी, सेमिनरी हिल्स येथील १३१४ ग्राहकांवर १.१४ कोटी, बिनाकी येथील ७१८ ग्राहकांवर ५८ लाख, इतवारीतील ६३२ वर ४७ लाख, खैरीपुरा येथील १०४५ वर ३.९३ कोटी, मेयो-मोमीनपुरा येथील २०९० ग्राहकांवर ७.३१ कोटी, पारडीतील ८३९ ग्राहकांवर ४७ लाख, श्रीकृष्णनगर येथील ७९९ ग्राहकांवर ८७ लाख, वर्धमाननगर येथील ७४७ ग्राहकांवर १.३३ कोटी, वाठोडा येथील ११४८ ग्राहकांवर १.०२ केटी, भगवाननगर येथील ७४६ ग्राहकांवर ४३ लाख, महाल येथील ४८९ ग्राहकांवर ३६ लाख, मानेवाडा येथील ७९९ वर ४९ लाख, रामबाग येथील ८८१ वर १.४७ आणि शांतिनगर येथील १७९६ ग्राकंवर १.७० कोटी रुपये थकीत आहे.

टॅग्स :electricityवीज