नागपूर शहरातील वीज ग्राहकांवर ५१ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:21 PM2019-03-04T12:21:25+5:302019-03-04T12:21:46+5:30

शहरात ३५,५९५ वीज ग्राहकांवर ५१.०८ कोटी रुपयाचे बिल थकीत आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने थकबाकीदारांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे.

51 crore tired of electricity consumers in Nagpur city | नागपूर शहरातील वीज ग्राहकांवर ५१ कोटी थकीत

नागपूर शहरातील वीज ग्राहकांवर ५१ कोटी थकीत

Next
ठळक मुद्दे१२,६१६ ग्राहकांनी वर्षभरापासून भरले नाहीत ३६.८५ कोटी

कमल शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ३५,५९५ वीज ग्राहकांवर ५१.०८ कोटी रुपयाचे बिल थकीत आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने थकबाकीदारांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत थकीत बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. एसएनडीएलच्या क्षेत्रात एकूण ५ लाख ५५ हजार ग्राहक आहेत. यापैकी ३५,५९५ ग्राहकांनी गल्या तीन महिन्यांंपासून आपले वीज बिल भरलेले नाही. एकीकडे पायाभूत विकासासाठी निधी कमी पडत आहे, तर दुसरीकडे थकीत बिल वाढून ५१.८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एसएनडीएलच्या आकडेवारीनुसार १२,१०३ ग्राहकांनी ३ महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंतचे वीज बिल भरलेले नाही. अशा ग्राहकांवर ३.८४ कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. तसेच १०,८७६ ग्राहकांनी सहा महिन्यांपासून एक वर्षापर्यंत १०.३९ कोटी रुपये भरलेले नाही. तर १२६१६ ग्राहकांनी तब्बल वर्षभरापासून वीज बिल भरलेले नाही. अशा ग्राहकांवर ३६.८५ कोटी रुपये थकीत आहे. एसएनडीएलने या ग्राहकांकडून वसुलीसाठी सर्व झोनमध्ये विशेष चमू गठित केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, वसुलीसाठी पोलिसांची मदतसुद्धा घेतली जाणार आहे. थकीत बिलामुळे एखाद्याची वीज कापण्यात आली, आणि त्याला शेजाऱ्याने वीज कनेक्शन दिले तर त्याच्याविरुद्ध सुद्धा इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल. त्याचप्रकारे जर परिसरात दोन कनेक्शन आहे. तो थकीत रकमेलाही दुसºया कनेक्शनवर ट्रान्सफर केले जाईल. त्याचप्रकारे थकबाकीदरांची संपत्तीही संलग्नित करण्याचा विचार केला जात आहे.

उच्चभ्रू परिसरातही सारखीच समस्या
साधारणपणे वीज बिल केवळ झोपडपट्टीतील ग्राहक थकवित असल्याची धारणा आहे. परंतु एसएनडीएलच्या आकडेवारीनुसार शहरातील उच्चभ्रू परिसरातही सारखीच समस्या आहे. या परिसरातील वीज ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणावर बिल थकविले आहे.
उदाहरणार्थ धरमपेठ परिसरातील ३०० ग्राहकांवर १९ लाख रुपये थकीत आहे. जरीपटक्यातील १५९४ ग्राहकांवर २.३२ कोटी, गोविंद भवन येथील ६४२ ग्राहकांवर ५६ लाख, कामठी रोड २४८३ ग्राहकांवर ४.४४ कोटी, काटोल रोडच्या १४९४ ग्राहकांवर १.१० कोटी, लष्करीबाग येथील १३४९ ग्राहकांवर ३.३८ कोटी, मानकापूर येथील १३१४ ग्राहकांवर १.१४ कोटी नारातील १९९५ ग्राहकांवर २.०१ कोटी, सेमिनरी हिल्स येथील १३१४ ग्राहकांवर १.१४ कोटी, बिनाकी येथील ७१८ ग्राहकांवर ५८ लाख, इतवारीतील ६३२ वर ४७ लाख, खैरीपुरा येथील १०४५ वर ३.९३ कोटी, मेयो-मोमीनपुरा येथील २०९० ग्राहकांवर ७.३१ कोटी, पारडीतील ८३९ ग्राहकांवर ४७ लाख, श्रीकृष्णनगर येथील ७९९ ग्राहकांवर ८७ लाख, वर्धमाननगर येथील ७४७ ग्राहकांवर १.३३ कोटी, वाठोडा येथील ११४८ ग्राहकांवर १.०२ केटी, भगवाननगर येथील ७४६ ग्राहकांवर ४३ लाख, महाल येथील ४८९ ग्राहकांवर ३६ लाख, मानेवाडा येथील ७९९ वर ४९ लाख, रामबाग येथील ८८१ वर १.४७ आणि शांतिनगर येथील १७९६ ग्राकंवर १.७० कोटी रुपये थकीत आहे.

Web Title: 51 crore tired of electricity consumers in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज