शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपुरात गांधीजींवर १६३ देशांचे ५००० वर टपाल साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 20:31 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.

ठळक मुद्देडाक तिकिटांमधून उलगडते राष्ट्रपित्याचे महात्म्यजीपीओमध्ये फिलाटेली संग्रहकांचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.नागपूर फिलाटिक्स सोसायटीच्यावतीने आंतरराष्ट्रीय फिलाटेली दिनानिमित्त जीपीओच्या राजहंस सभागृहात हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना हे प्रदर्शन समर्पित असून शहरातील टपाल साहित्य संग्राहकांनी त्यांच्या संग्रहातील गांधीजींवरील दुर्मिळ टपाल साहित्य येथे मांडले आहेत. स्टॅम्प, तिकिटा, लिफाफे, आंतरदेशीय पत्र, युनिक आर्टिकल्स, कॅन्सलेशनसह असलेले कव्हर, नाणी, भारतीय व आंतरराष्ट्रीय करन्सी आदी दुर्मिळ गोष्टी या प्रदर्शनात पाहता येतात. फिलाटेली सोसायटीचे संस्थापक जयंत खेडकर यांनी माहिती देताना सांगितले, ७५ वर्षाचे सर्वात वरिष्ठ संग्राहक सुधाकर सोनार यांच्यापासून सर्वात लहान संग्राहक कीर्ती दुबे यांनी संग्रहित केलेल्या वस्तू या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या. स्वत: खेडकर यांनी गांधीजींवरील शुद्ध चांदीचे तिकीट, स्वित्झर्लंड सरकारने प्रकाशित केलेले तिकीट व इतर साहित्य येथे ठेवले. यासह रूपकिशोर कनोजिया यांचे अमेरिका, इंग्लंड, ताजकिस्तान, शारजाह, युनान, नायजेरिया आदी २५ देशांनी गांधीजींवर काढलेले टपाल साहित्य आणि करन्सी प्रदर्शनात मांडल्या. याशिवाय गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने पहिल्यांदा काढलेले गोल तिकीट, नाणे विशेषज्ञ रामसिंग ठाकूर यांचे आतापर्यंत निघालेली दुर्मिळ नाणी, कपिल बन्सोड यांनी संग्रहित केलेले गांधीजी व सहकाºयांचे टपाल साहित्य, अनिल मेश्राम यांचे विविध चित्रांवर स्टॅम्प व कव्हर लावून माहिती सादर केलेले प्रदर्शन, नितीन बक्षी, विजय पटेल आदी संग्राहकांचे १५०० च्यावर टपाल साहित्य, नाणी, नोट आणि कॅन्सलेशन स्टॅम्प या प्रदर्शनात मांडण्यात आले.गांधीजींच्या हत्येनंतर १९४८ साली पहिल्यांदा त्यांच्यावर डाक तिकीट भारत सरकारने काढले होते. नेमके त्याच वर्षी इंग्लंड व स्वित्झर्लंड सरकारनेही त्यांच्यावर डाक तिकीट काढले. अशी दुर्मिळ तिकिटे, स्टॅम्प तसेच महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्यापासून भारतात आगमन, चंपारण्य सत्याग्रह, दांडीयात्रा, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग, चले जाओ चळवळ, गोलमेज परिषद, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा करतानाचे तिकीटे, पोस्टकार्ड, कव्हरपेज असे सर्व दर्शविणारा हा संग्रह लक्ष वेधणारा ठरला. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विशेष भेट आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीPost Officeपोस्ट ऑफिस