नागपुरात  ५०० अतिक्रमणे हटविली, ११ ट्रक साहित्य जप्त, ३२ हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:54 PM2021-01-27T23:54:49+5:302021-01-27T23:56:39+5:30

encroachments removed महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी विविध भागातील ५०० अतिक्रमणे हटवून ११ ट्रक साहित्य जप्त केले. तसेच, ३२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. या कारवाईनंतर शहराने मोकळा श्वास घेतला.

500 encroachments removed in Nagpur, 11 truckloads of materials seized, 32,000 fines recovered | नागपुरात  ५०० अतिक्रमणे हटविली, ११ ट्रक साहित्य जप्त, ३२ हजार दंड वसूल

नागपुरात  ५०० अतिक्रमणे हटविली, ११ ट्रक साहित्य जप्त, ३२ हजार दंड वसूल

Next
ठळक मुद्देमनपाची कारवाई : शहराने घेतला मोकळा श्वास

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी विविध भागातील ५०० अतिक्रमणे हटवून ११ ट्रक साहित्य जप्त केले. तसेच, ३२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. या कारवाईनंतर शहराने मोकळा श्वास घेतला.

नेहरूनगर झोनमध्ये हसनबाग चौक, ज्योती शाळा, गाडगेनगर व रमना मारुती या भागातील रोडच्या दोन्ही बाजूची ७५ अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्यांकडून १२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनमध्ये नंगा पुतळा, पन्नालाल देवडिया हायस्कूल, गांधीबाग उद्यान, भावसार चौक व इतवारी भागातील ७८ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, सहा हातठेले जप्त करून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनमध्ये गांधीसागर तलाव, मानवता हायस्कूल, त्रिशरण चौक, मनीषनगर, पुरुषोत्तम बाजार व नरेंद्रनगर या भागातील ७६ अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान, चार हातठेले जप्त करण्यात आले.

धरमपेठ झोनमध्ये रामनगर ते अमरावती रोडपर्यंतचे फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तेथील हातठेले व इतर अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. हनुमाननगर झोनमध्ये मानेवाडा चौक, उदयनगर चौक व म्हाळगीनगर चौक या भागातील ७४ अतिक्रमणे काढण्यात आली. मनपा उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

इतर कारवाई : सतरंजीपुरा झोन

दहीबाजार पूल, मारवाडी चौक, जुना भंडारा रोड, शहीद चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, भारतमाता चौक, नेहरू पुतळा चौक, मस्कासाथ या भागातील ७६ अतिक्रमणे हटविण्यात आली.

लकडगंज झोन

गोमती हॉटेल, भारतनगर चौक, कृष्णा रिंग रोड, चिखली प्रवेशद्वार या भागातील ६६ अतिक्रमणे काढण्यात आली. एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

आसीनगर झोन

ग्रामीण आरटीओ कार्यालय, लाल गोदाम, पाटणकर चौक, सुगतनगर चौक येथील ७६ अतिक्रमणे काढण्यात आली. दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: 500 encroachments removed in Nagpur, 11 truckloads of materials seized, 32,000 fines recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.