५०० उमेदवार ‘लर्निंग’च्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: April 25, 2015 02:19 IST2015-04-25T02:19:36+5:302015-04-25T02:19:36+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये शिकाऊ वाहनचालकांची संगणक परीक्षा शुक्रवारीही घेण्यात आली नाही.

५०० उमेदवार ‘लर्निंग’च्या प्रतीक्षेत
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये शिकाऊ वाहनचालकांची संगणक परीक्षा शुक्रवारीही घेण्यात आली नाही. यंत्रणेत बिघाड आल्याने सोमवारपासून ही परीक्षा ठप्प आहे. परिणामी ५०० वर शिकाऊ वाहनचालकांवर परवान्यासाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.
शिकाऊ वाहनपरवान्यासाठी (लर्निंग लायसन्स) शिकाऊ वाहनचालकांना संगणक परीक्षा देणे सक्तीचे आहे. आरटीओ, शहर कार्यालयात २० एप्रिल रोजी या यंत्रणेत बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी त्याच दिवशी पुण्याच्या एनआयसीकडे (नॅशनल इनफॉरमेशन सेंटर) संगणकाच्या चिप पाठविण्यात आल्या. शुक्रवारपर्यंत ती दुरुस्त होण्याची शक्यता होती. यामुळे ज्यांची परीक्षा राहिली होती त्यांना बोलविण्यात आले.
या शिवाय आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घेऊन येणाऱ्यांनी गर्दी केली. परंतु यंत्रणा सुरूच न झाल्याने याचा फटका सर्वांनाच बसला. ही यंत्रणा कधी सुरू होईल याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. परंतु यंत्रणा दुरुस्तीसाठी एनआयसीला सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)