५० तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:35+5:302021-07-05T04:07:35+5:30

कामठी : इंडियन फ्रेंड ग्रुपच्या वतीने कामठी शहरातील ईस्माईलपुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. या शिबिरात ५० ...

50 youths donated blood | ५० तरुणांनी केले रक्तदान

५० तरुणांनी केले रक्तदान

कामठी : इंडियन फ्रेंड ग्रुपच्या वतीने कामठी शहरातील ईस्माईलपुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. या शिबिरात ५० तरुणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन ठाणेदार विजय मालचे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून इंडियन फ्रेंड ग्रुपचे मोहम्मद सद्दाम, फरान पटेल, इजामुद्दीन, मोहम्मद इमरान, मोहसिन अख्तर, साजिद अख्तर, जावेद अख्तर उपस्थित होते. ठाणेदार विजय मालचे यांनी रक्ताची गरज आणि रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तदान ही चळवळ व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले. रक्तसंकलन नागपूर येथील अमन ब्लड बँकचे डॉ. नरेश गुरबानी, डॉ. प्रियंका जैन यांच्या मार्गदर्शनात सुनील कानतोडे, सिमरन डॅनियल, सरिता गायधने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन मोहम्मद सद्दाम यांनी केले.

Web Title: 50 youths donated blood