शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:05 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली.

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षात देशातील व्यापारी बँकांची संख्या जवळपास तीनपट वाढून ८९ वरून २२२ झाली तर ठेवी मात्र २६३१ पटीने वाढून ४६४६ कोटींवरून तब्बल १२२.२६ लाख कोटींवर पोहोचल्या, अशी माहिती औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अ‍ॅकेडमीने (बेट्रा) संकलित केलेल्या आकडेवारीतून उघड होते.बँकांमधील ठेवी या जनतेच्या आर्थिक प्रगतीच्या मानक असतात या निकषावर जनतेची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचा निष्कर्ष निघतो.याच कालावधीत व्यापारी बँकांचे एकूण कर्ज २१४७ पटीने वाढून ३५९९ कोटीवरून ७७.३० लाख कोटींवर गेले आहे. बँकांचे कर्जवाटप हे उद्योग/व्यापार क्षेत्रांची प्रगती दाखवते. यावरून देशातील उद्योग/व्यापार क्षेत्राने किती प्रगती केली त्याचा अंदाज येतो.या कर्जामध्ये प्राधान्य क्षेत्र म्हणजे कृषी, गृहउद्योग, लघु व मध्यम उद्योग युवा/महिला उद्योजकांचे व्यवसाय हे येतात. प्राधान्य क्षेत्राकडील कर्ज ५०४ कोटीवरून तब्बल २५.५५ लाख कोटीवर गेले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जाची ही वाढ ५०६५ पट आहे.बँकांच्या ठेवी आणि कर्जवाटप यांचे प्रमाण बँका आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत ते दर्शवते. साधारणत: ठेवींच्या किमान ६५टक्के कर्जवाटप मानले जाते.भारतीय बँकांचे ठेवी-कर्ज प्रमाण ५० वर्षापूर्वी ७७.५० टक्के होते ते वाढून २०१९ साली ७८.२० टक्के झाले आहे ही चिंतेची बाब आहे.>५० वर्षातील व्यापारी बँकांची प्रगतीक्र. जून १९६९ मार्च २०१९१ व्यापारी बँकांची संख्या ८९ २२२२ शाखांची संख्या ८२६२ १.४१ लाख३ ठेवी रु.४६४६ कोटी रु. १२२.२६ लाख कोटी४ कर्जवाटप रु. ३५९९ कोटी रु. ७७.३० लाख कोटी५ प्राधान्य क्षेत्र कर्ज ५०४ कोटी २५.५३ लाख कोटी६ ठेवींशी कर्जाचे प्रमाण ७७.५०% ७८.२०%