वासनकरविरुद्ध ५० हजार पानी आरोपपत्र

By Admin | Updated: July 17, 2015 02:53 IST2015-07-17T02:53:35+5:302015-07-17T02:53:35+5:30

शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गुंतवणुकीचा गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष

50 thousand water chargesheets against Vasnakar | वासनकरविरुद्ध ५० हजार पानी आरोपपत्र

वासनकरविरुद्ध ५० हजार पानी आरोपपत्र

अलीकडच्या इतिहासातील विक्रम : गुंतवणूकदारांची १६९ कोटींनी फसवणूक
नागपूर : शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गुंतवणुकीचा गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ४७८ गुंतवणूकदारांची १६९ कोटी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी बुधवारी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात ३० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
१ यापूर्वी दोन टप्प्यात १०-१० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण ५० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अलीकडच्या नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील हा वेगळाच विक्रम आहे.
२ वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, भाऊ विनय जयदेव वासनकर, साळा अभिजित चौधरी, सासू कुमुद चौधरी, पत्नी भाग्यश्री प्रशांत वासनकर, भावसून मिथिला विनय वासनकर, व्यवस्थापक सारिका चंदेल ऊर्फ चारकुंडे आणि बिझनेस प्रमोटर सुजित मुझुमदार यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र आहे. आरोपींपैकी मिथिला, सारिका, कुमुद चौधरी आणि मुझुमदार हे आरोपपत्र दाखल करतेवेळी न्यायालयात हजर होते. ते सर्व जामिनावर आहेत. प्रशांत, विनय आणि भाग्यश्री, असे तिघे कारागृहात आहेत.
३या प्रकरणात आणखी बरेच आरोपी अटक होणे बाकी असून, त्यांच्या अटकेनंतर आणखी आरोपपत्र दाखल होणार आहेत. आर्थिक गुन्हे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांनी हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
४९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकरसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ४०९, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी ४७८ गुंतवणूकदारांची १६९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे, पीडित गुंतवणूकदारांचे वकील अ‍ॅड. बी.एम. करडे, अ‍ॅड. भारत बोरीकर उपस्थित होते. भाग्यश्रीच्या जामिनावर
आज हायकोर्टात सुनावणी
या प्रकरणातील सूत्रधारांपैकी एक भाग्यश्री प्रशांत वासनकर हिच्या जामीन अर्जावर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाग्यश्रीने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा पैसा आपल्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे शेअर्स मुंबई येथील नरेश चंदन आणि चेतना चंदन यांच्यामार्फत खरेदी केले होते. हे शेअर्स १ लाख २४ हजार ८८ एवढे असून ते सिक्कीम फेरो अलॉईड या कंपनीचे आहेत. भाग्यश्रीने गुंतवणूकदारांना सदस्य बनवून १८ कोटी रुपये प्राप्त केले होते. याशिवाय तिने कंपनीचे २५ कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले होते. ती परिधी ट्रेडिंगची संचालकही होती. परिधीच्या खात्यातील रोख आणि शेअर्सही तिने आपल्या खात्यात जमा केले होते. आपल्या खात्यातून तिने नरेश चंदन, अनिल सावरकर, विलास भोयर, सदोदय इन्व्हेस्टमेंट, रिना जैन, रत्नेश जैन, अविनाश भुते यांना मोठमोठ्या रकमा दिल्या होत्या, असे तपास पथकाला आढळून आले आहे.

Web Title: 50 thousand water chargesheets against Vasnakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.