शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

उपराजधानीवर ५० टक्के पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 09:48 IST

नागपूर जिल्ह्यातील पेंच जलाशयात सध्या फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे संकेतपाणी गळती १५ टक्क्यापर्यंत खाली आणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुरा पाऊस, त्यातच पावसाने दिलेली ओढ आणि मध्य प्रदेशातील चौराई येथे झालेल्या धरणामुळे जिल्ह्यातील पेंच जलाशयात कमी पाणीसाठा आहे. सध्या फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याचा विचार करता नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्या उर्वरित दिवसात प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही तर शहराच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करावी लागेल, असा धोका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तविला. यासाठी महापालिकेने वेळीच सावधा होऊन नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.पेंच-तोतलाडोह येथे पाण्याचा अत्यंत कमी साठा असल्याने शहराचे पाण्याचे आरक्षण कमी झाले तर अशा परिस्थितीत महापालिके ने करावयाच्या संभाव्य उपाययोजना संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुुरुवारीमहालातील नगर भवन येथे आढावा बैठक घेतली. यानंतर पालकमंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात आले नाही असे पाणीसंकट आले आहे. पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने पाणी संरक्षण, संवर्धन आणि बचतीचा आराखडा तयार करावा, तसेच शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के गळती असून ती १५ टक्केपर्यंत खाली आणण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. सध्या कन्हानमधून ६५.७१ दशलक्ष घनमीटर, पेंच नवेगावमधून ११२ दलघमी, तात्पुरत्या व्यवस्थेतून ७८ दलघमी पाणीपुरवठा शहराला केला जातो. जलशुद्धीकरण केंद्र कन्हान व पेंच १ ते ४ येथे ७८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.यातून ६६५ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करण्यात येते. सद्यस्थितीत चालू असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये १९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा होतो. परंतु पेंच-तोतलाडोह येथील पाणीसाठा कमी झाला तर त्याचा पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बैठकीत महापौर नंदा जिचकार,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, डॉ. आशिष देशमुख, प्रा.जोगेंद्र कवाडे, उपमहापौर पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.

मध्य प्रदेश सरकारसोबत चर्चा करणारपेंच, तोतलाडोहमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे नागपूर शहरासोबतच कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्रालाही पाण्याची टंचाई जाणवणार आहे. तीव्र टंचाई निर्माण झाली तर त्याचा वीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा विचार करता मध्यप्रदेश शासनाशी चर्चा सुरू आहे. चौराई प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोहमधील संपूर्ण वीज मध्यप्रदेशला देऊन त्याबदल्यात चौराईचे पाणी घेण्याची आपली तयारी आहे. या संदर्भात लवकरच मध्यप्रदेश शासनाशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.पालकमंत्र्यांची मनपावर नाराजीशहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात गेल्या दीड वर्षापासून महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. त्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. परंतु आता अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. दोषीवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

सतरंजीपुुरा व गांधीबागमध्ये सर्वाधिक गळतीशहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के गळती आहे. यात सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ७०टक्के गळती आहे. लक्ष्मीनगरमध्ये २५ टक्के, धरमपेठ ३५ टक्के, हनुमाननगर २५ टक्के, नेहरूनगर ३० टक्के , धंतोली व मंगळवारी झोनमध्ये ५० टक्के , आशिनगर ६५ टक्के, म्हणजेच एकूण पाणीपुरवठ्यापैक ५० टक्के पाणी गळतीत वाया जाते. येत्या दोन महिन्यात १५ टक्के गळतीवर महापालिका आली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाईपाऊस कमी होणार हे गृहित धरून व पाण्याची गळती कमी करून, अवैध कनेक्शन बंद करून पाण्याचे नियोजन केले तरच पाणीटंचाईचा सामना करता येईल. शहरात पाच हजार बोअरवेल आहेत. यातील तीन हजार नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरोघरी जा, त्या नागरिकांशी चर्चा करा. त्यांच्या घरातील विहीर हातपंप व अन्य पाण्याचे स्रोत तपासून घ्या. बंद असतील तर सुरू करा, शक्य त्या सर्व उपाययोजना करा. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई व शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी