माजी नगराध्यक्ष झाडेंसह ५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:08 IST2021-03-16T04:08:51+5:302021-03-16T04:08:51+5:30
वाडी : भाजपचे माजी जिल्हा मंत्री आणि वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांच्यासह वाडीतील ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी ...

माजी नगराध्यक्ष झाडेंसह ५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
वाडी : भाजपचे माजी जिल्हा मंत्री आणि वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांच्यासह वाडीतील ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. गत आठवड्यात झाडे यांनी पत्रपरिषद घेत हिंगण्याचे आ. समीर मेघे यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला त्रस्त होत भाजपला रामराम करीत असल्याचे जाहीर केले होते. झाडे यांच्यासह माजी शहर अध्यक्ष अभय कुणावार, गणेश राठोड, जगदीश लिकडे, मुरली जुमडे, पीयूष धाडसे, विजय सोनवणे, उमेश पडोळे, जटाशंकर पांडे, प्रफुल चोखंद्रे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. वाडीतील झाडे गट राष्ट्रवादीत दाखल झाल्याने भविष्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीवर याचा काय प्रभाव पडेल, हे त्याच वेळी स्पष्ट होईल.