शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अर्थसंकल्पात नागपूरच्या 'ग्रोथ हब'साठी पाच हजार कोटी; रिंगरोड प्रकल्पालाही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:08 IST

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूर महानगराला 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूर महानगराला 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर 'पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब'साठी नीती आयोग रोड मॅप तयार करणार आहे. या निधीतून उद्योग, आयटी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीला चालना दिली जाणार आहे. राज्यातील मोठ्या शहरांसह नागपूरमध्येही मेट्रो नेटवर्क विस्तार आणि शहरी वाहतूक सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे.

नागपूरला 'न्यू नागपूर' या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र (ट्रेड अँड फायनान्शियल सेंटर) म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यामुळे आयटी, सेवा व उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार. नागपूर शहराच्या विस्तारासाठी नागपूर रिंगरोड प्रकल्पाला मान्यता. वाहतूक सुलभता व औद्योगिक विकासासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. राज्याच्या सार्वभौम डेटाचे व अनुप्रयोगांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी नागपूर येथे अत्याधुनिक 'स्टेट डेटा सेंटर' स्थापन केले जाईल. नैसर्गिक तसेच मानव-निर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी 'मिहान' नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल. सार्वजनिक आरोग्याच्या सर्वकष उन्नतीसाठी एम्स, आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे 'महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था' स्थापन करणार. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार. नागपूरमध्ये आरोग्य व उद्योग प्रकल्प बहु-विशेषता रुग्णालय आणि सौरऊर्जा उत्पादन प्रकल्प यांसारख्या गुंतवणुकींना चालना दिली जाईल.

राष्ट्रीय महामार्ग व मेट्रो विकास

नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वर्धा बंदरांना जोडण्यासाठी नवा-भंडारा मल्टिमोडल वाहतूक कॉरिडॉर विकसित केला जाणार. मुंबई, पुणे व नागपूरसाठी ४९० किमी मेट्रोचे जाळे उभारले जाईल. यामुळे १७३ किमीच्या मार्गिका खुल्या होतील. याचा नागपूरला विशेष लाभ होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's Growth Hub Receives ₹5,000 Crore Boost; Ring Road Approved

Web Summary : Nagpur gets a ₹5,000 crore boost to become a 'Growth Hub' with focus on industry, IT, and infrastructure. Ring road project approved for expansion and ease of traffic. State Data Center and Disaster Management Institute to be established. Metro network expansion will greatly benefit Nagpur.
टॅग्स :nagpurनागपूरBudgetअर्थसंकल्प २०२६