उद्योजकाला ५ लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:07 IST2021-05-13T04:07:57+5:302021-05-13T04:07:57+5:30
नागपूर : मशीन लावून देण्याच्या नावावर एका उद्योजकाला ५ लाखांचा चुना लावण्यात आला. वाडी पोलिसांनी मुंबईतील जय शहा नावाच्या ...

उद्योजकाला ५ लाखांचा चुना
नागपूर : मशीन लावून देण्याच्या नावावर एका उद्योजकाला ५ लाखांचा चुना लावण्यात आला. वाडी पोलिसांनी मुंबईतील जय शहा नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठ येथील रहिवासी साहिल शहा यांची नागलवाडी येथे सिंगनम फायर प्रोटेक्शन इंडिया प्रा. लि. नावाची कंपनी आहे. साहिल यांना जर्मनी येथे तयार झालेली एक मशीन लावायची होती. आरोपी जय शहाने त्यांना मशीनची निर्माता कंपनीतर्फे त्याला मशीन लावून देण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. आरोपीने मशीन लावून देण्यासाठी ५ लाख रुपये मागितले. साहिल यांनी त्यांंना मशीनसाठी पैसे दिले. परंतु नंतर त्यांना जय शहाकडे असा कुठलाही अधिकार नसल्याचे उघडकीस आले. यानंतर साहिल यांनी वाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.