कोवॅक्सिनचे ४९ तर, कोविशिल्डचे ७५ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:34+5:302021-02-06T04:12:34+5:30

नागपूर : मेडिकलच्या दोन केंद्रांवर भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ तर शहरातील इतर १८ केंद्रांवर सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ ही लस दिली ...

49% of covacin vaccines and 75% of covshield vaccinations | कोवॅक्सिनचे ४९ तर, कोविशिल्डचे ७५ टक्के लसीकरण

कोवॅक्सिनचे ४९ तर, कोविशिल्डचे ७५ टक्के लसीकरण

नागपूर : मेडिकलच्या दोन केंद्रांवर भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ तर शहरातील इतर १८ केंद्रांवर सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ ही लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात ‘कोवॅक्सिन’ची २००० पैकी ९९९ लाभार्थ्यांनी (४९ टक्के) लस घेतली. तर, कोविशिल्डचे १२३०० पैकी ९३४१ लाभार्थ्यांनी (७५.९४ टक्के) लस घेतली. गुरुवारी कोविशिल्ड लसीचे ७७.६७ टक्के तर कोवॅक्सिनचे १४८ टक्के लसीकरण झाले.

नागपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात पोलीस, मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोविशिल्डच्या मेयोचा ‘अ’ केंद्रावर १३०० लसीकरणाचे लक्ष्य होते. त्यापैकी ९०१ (६९.३१ टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मेयोचा ‘ब’ केंद्रावर २०० पैकी ११३ (५६.५० टक्के), ‘एम्स’ केंद्रावर १२०० पैकी ७९८ (५९ टक्के), डागा हॉस्पिटलच्या केंद्रावर १३०० पैकी ६४४ (४९.५४ टक्के), पीएमएच हॉस्पिटल ‘अ’ केंद्रावर १३०० पैकी ९७६ (७५.०८), याच हॉस्पिटलच्या ‘ब’ केंद्रावर ३०० पैकी २३१ (७७ टक्के), मनपा आयसोलेशन हॉस्पिटलच्या केंद्रावर ७०० पैकी ८०३ (११४.७१ टक्के), ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी ८४० (१४० टक्के), सीम्स हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी ५०९ (८४.८३ टक्के), दंदे हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी ३९३ (६५.५० टक्के), वोक्हार्ट हॉस्पिटलचा केंद्रावर ६०० पैकी ५१८ (८६.३३ टक्के), इसिस हॉस्पिटलचा केंद्रावर ६०० पैकी ४०३ (६७.१७ टक्के), जाफरी हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी २९७ (४९.५० टक्के), कुबडे हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी २३७ (३९.५० टक्के), भावना हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी ६५८ (१०९.६७ टक्के), किंग्जवे हॉस्पिटलच्या केंद्रावर ६०० पैकी ६५८ (१०९.६७), अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ४०० पैकी ५२९ (१३२.२५ टक्के) तर म्युर मेमोरीअल हॉस्पिटलच्या केंद्रावर २०० पैकी २७० (१३५ टक्के) लाभार्थ्यांनी लस घेतली.

मेडिकलच्या कोवॅक्सिनचा ‘अ’ केंद्रावर १३०० पैकी ६५५ (५०.३८ टक्के) तर, ‘ब’ केंद्रावर ७०० पैकी ३४४ (४९.१४ टक्के) लोकांना लस देण्यात आली.

- ११६५ लाभार्थ्यांनी कोविशिल्ड तर, २९६ लाभार्थ्यांनी घेतली कोवॅक्सिन

गुरुवारी कोविशिल्डचा १८ केंद्रांवर १५०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ११६५ (७७.६७ टक्के) लाभार्थ्यांनी लस घेतली. कोवॅक्सिनच्या दोन केंद्रांवर २०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामधील ‘अ’ सेंटरवर १०० पैकी १७८ तर ‘ब’ सेंटरवर १०० पैकी ११८ असे एकूण २०० पैकी २९६ (१४८ टक्के) लाभार्थ्यांनी लस घेतली.

Web Title: 49% of covacin vaccines and 75% of covshield vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.