शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेला मिळाले कबाडातून घबाड, ४८३ कोटींचे झाले जुगाड; जागोजागची जागाही झाली स्वच्छ

By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2023 19:30 IST

मध्य रेल्वेला कबाडातून ४८३.२९ कोटी रक्कम मिळाली. 

नागपूर: कबाडातून कला निर्माण होत असल्याचे अनेकांनी अनेकदा दाखवून दिले आहे. कबाडातून जुगाड करून कुणी नव-नव्या वस्तूही तयार करतात. तर, याच कबाडातून अनेक जण रोजी रोटीचेही जुगाड करतात. मात्र, मध्य रेल्वेने कबाडातून चक्क ४८३. २९ कोटींचे जुगाड केले आहे. मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून आज ही माहिती देण्यात आली आहे.

रेल्वेत मोठ्या प्रमाणावर लोखंडी वस्तू आणि साहित्याचा वापर केला जातो. निकामी झालेले साहित्य रेल्वेस्थानके तसेच रेल्वेची विविध कार्यालये, वर्कशॉप, शेड तसेच कारखान्यात अस्तव्यस्त पडून दिसते. काहीही उपयोग नसल्याने हे कबाड तसेच पडून राहते. त्यामुळे जागाही व्यापते अन् अडचणही निर्माण होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक चोरटे या कबाडावर हातही साफ करतात.

 हे लक्षात आल्यानंतर गेल्या दोन- तीन वर्षांपासून रेल्वेत स्वच्छता मिशन राबविणे सुरू केले. त्यानुसार, जागोजागी पडलेले निकामी कबाड एकत्र करून त्याची विक्री करण्याचा सपाटा रेल्वेने लावला. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतही अशाच प्रकारे ठिकठिकाणचे कबाड एकत्र करून मध्य रेल्वेने त्याची विक्री केली. या कबाडाच्या विक्रीतून मध्य रेल्वेला थोडेथोडके नव्हे तर चक्क ४८३ कोटी, २९ लाख रुपये मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ३६ : १४ टक्के अधिक आहे.

झिरो स्क्रॅप मिशनचा परिणामकबाडातून अशा प्रकारे मोठ्या रकमेचे जुगाड करण्याचा हा 'जिरो स्क्रॅप मिशन'चा परिणाम आहे. जागोजागी धुळखात पडलेले आणि विविध कार्यालयाची जागा व्यापणारे कबाड विकून गेल्या वर्षी मध्य रेल्वेने ३५५ कोटी रुपये मिळवले होते. यंदा ही रक्कम ४८३ : २९ कोटींवर पोहचली आहे. अर्थात आता पर्यंत दरवर्षी कबाडाच्या विक्रीतून रेल्वेला मिळणारी यंदाची ही रक्कम रेकॉर्डब्रेक असल्याचे अधिकारी सांगतात.

वातावरण स्वच्छ आणि पर्यावरण पूरकठिकठिकाणचे कबाड विक्रीसाठी काढून ती जागा रिकामी करण्यात आल्याने रेल्वेच्या अनेक कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि पर्यावरण पूरक झाला आहे. यापुढे एक मिशन म्हणून विविध ठिकाणी असलेले कबाड मध्य रेल्वेचे अधिकारी चिन्हीत करतील आणि त्याची अशाच प्रकारे विल्हेवाट लावली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे