480 crore outstanding of property tax in Nagpur | नागपुरात मालमत्ताकराची ४८० कोटींची थकबाकी

नागपुरात मालमत्ताकराची ४८० कोटींची थकबाकी

ठळक मुद्दे३.८७ लाख मालमत्ताधारक थकबाकीदार : ३५१ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लवकरच लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिके च्या मालमत्ता कर विभागाच्या रेकॉर्डनुसार नागपूर शहरात जवळपास ५ लाख ४० हजार मालमत्ता आहे. यातील ३ लाख ८७ हजार १०७ मालमत्ताधारकांकडे तब्बल ४८० कोटींची थकबाकी आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय मालमत्तांचाही समावेश आहे.
मागील अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्यांकडून वसुलीसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. देयके वेळेवर मिळत नसल्याची नागरिकांची दरवर्षी तक्रार असायची परंतु २०१९-२० या वर्षातील देयकाचे वाटप पूर्ण झाले आहे. यामुळे वसुलीत वाढ झाली आहे. १९ ऑगस्टपर्यंत ७५ कोटींची वसुली झाली आहे. १ लाख ५० हजार ७३४ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यात नियमित कर भरणाऱ्या ९४ हजार ६९२ मालमत्ता धारकांनी ४८ कोटी तर थकबाकी वसुलीतून २७ कोटी वसुलीतून जमा झाले. मागील वर्षात याच कालावधीत ४८ कोटींची वसुली झाली होती. या तुलनेत यंदा वसुली २७ कोटींनी वाढली आहे.
शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची संख्या ५४ हजार ४२ इतकी आहे. अशा थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून विक्री केली जाते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३५१ मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. या मालमत्तांचा लवकरच लिलाव के ला जाणार असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.
१२० मालमत्ता मनपाच्या नावावर करणार
वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंट बजावले, जप्तीची कारवाई करून लिलाव करण्यात आला. मात्र लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अशा १२० मालमत्ता आता महापालिके च्या नावावर केल्या जात आहेत. यातील काही मालमत्ता मनपाच्या नावावर करण्यात आल्या आहेत
३५१ मालमत्तांचा लिलाव करणार
वर्षानुवर्षे कर थकीत असणाऱ्या ३५१ मालमत्ताधारकांकडे २६ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे. मालमत्ता जप्तीची नोटीस बजावल्यानंतरही या मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
खुल्या भूखंडधारकांनी देयके प्राप्त करावी
मालमत्ताधारकांना देयकांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु खुल्या भूखंडधारकांना देयक वाटप करताना अडचणी येतात. बहुसंख्य भूखंडधारक दुसरीकडे वास्तव्यास असल्याने त्यांना देयके वाटप करता आलेली नाही. अशा खुल्या भूखंडधारकांनी झोन कार्यालयातून आपली देयके प्राप्त करून कर भरावा असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

 

Web Title: 480 crore outstanding of property tax in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.