शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द

By नरेश डोंगरे | Updated: December 1, 2023 21:54 IST

४ गाड्यांचा प्रवास अर्धवट; तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार : हजारो प्रवाशांना होणार मनस्ताप

नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान सुरू असलेल्या थर्ड रेल्वे लाईन वर्कचा फटका या मार्गावरील ४८ रेल्वे गाड्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर, या ४८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, ४ गाड्यांचा प्रवास अर्धवट राहणार आहे. तर, तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत. यामुळे आधीच प्रवासाचे नियोजन करून असलेल्या हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होणार आहे.

नागपूर नजिकच्या कन्हान तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे २ ते१४ डिसेंबरपर्यंत नॉन इंटरलॉकिंग वर्क करण्यात येणार आहे. त्यासाठी या अवधित खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.गोंदिया-इतवारी मेमू, इतवारी-गोंदिया मेमू, इतवारी-रामटेक मेमू, रामटेक-इतवारी मेमू, रायपूर - ईतवारी पॅसेंजर स्पेशल, इतवारी-तिरोड़ी पॅसेंजर स्पेशल, तिरोड़ी-तुमसर पॅसेंजर स्पेशल, इतवारी रायपूर पॅसेंजर स्पेशल, तिरोड़ी-इतवारीपॅसेंजर स्पेशल, टाटानगर इतवारी एक्सप्रेस, इतवारी टाटानगर एक्सप्रेस, हावडा - छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस - हावडा एक्सप्रेस, बिलासपूर भगत की कठी एक्सप्रेस,भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर - बिकानेरर एक्सप्रेस, बिकानेर - बिलासपूर एक्सप्रेस, ओखा-शालीमार एक्सप्रेस, शालीमार-ओखा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल पुरी एक्सप्रेस, पुरी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल- हटिया एक्सप्रेस, तिरूनेलवेली बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर तिरूनेलवेली एक्सप्रेस, संतरागाछी-पुणे एक्सप्रेस, पुणे-संतरागाछी एक्सप्रेस, विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम एक्सप्रेस, गांधीधाम-पुरी एक्सप्रेस, पुरी-गांधीधाम एक्सप्रेस, पुरी-अजमेर एक्सप्रेस, अजमेर-पुरी एक्सप्रेस, रीवां-इतवारी एक्सप्रेस, इतवारी- रीवां एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्यांचा रद्द गाड्यांमध्ये समावेश आहे.

अर्धवट प्रवास करणाऱ्या गाड्या४ ते १२ डिसेंबर दरम्यान धावणारी ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, ६ ते १४ डिसेंबर दरम्यान ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल. ५ ते १३ डिसेंबर पर्यंत १२१०५ मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. ६ ते १४ डिसेंबरपर्यंत धावणारी १२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.

उशिरा सुटणाऱ्या गाड्यायाच कामाचा फटका बसल्याने काही गाड्या प्रवासाला सुरूवातच उशिरा करणार आहेत. त्यात ६ ते ९ डिसेंबर दरम्यान धावणारी इतवारी कोरबा शिवनाथ एक्सप्रेस ही गाडी इतवारी (नागपूर) स्थानकावरून २ तास उशिरा धावेल. ८ आणि ९ डिसेंबरला १२८०८ निजामुद्दीन विशाखापट्टनम समता एक्सप्रेस ही गाडी निजामुद्दीन स्थानकावरून १ तास ३० मिनिटे उशिरा प्रवास सुरू करेल तर ९ डिसेंबरला साईनगर शिर्डी - हावडा एक्सप्रेस साईनगर शिर्डी येथून ३० मिनिटे उशिरा निघणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे