४८ हजाराचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:09+5:302021-02-05T04:43:09+5:30
नरखेड : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत ४८ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरून नेले. ही घटना नरखेड शहरातील वाॅर्ड ...

४८ हजाराचे दागिने पळविले
नरखेड : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत ४८ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरून नेले. ही घटना नरखेड शहरातील वाॅर्ड क्र. ३ येथे २४ जानेवारी राेजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राहुल सूर्यभान कामडे (२४, रा. वाॅर्ड क्र. ३, नरखेड) यांच्या घराचे कुलूप ताेडून चाेरट्याने आत प्रवेश केला. त्यात चाेरट्याने घरातील कपाटात ठेवलेली पाच ग्रॅमची पाेत किंमत ५,००० रुपये व ४३ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४८ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच राहुल कामडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार मनाेज गाढवे करीत आहेत.