सूर्यनमस्काराची ४७ वर्षांची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST2021-02-26T04:09:28+5:302021-02-26T04:09:28+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : स्थानिक श्री मुनीश्वर महाराज मंदिरातील सूर्यनमस्काराला ४७ वर्षांची परंपरा आहे. स्व. देवराव लांभाडे गुरुजी ...

47-year-old tradition of sun salutation continues | सूर्यनमस्काराची ४७ वर्षांची परंपरा कायम

सूर्यनमस्काराची ४७ वर्षांची परंपरा कायम

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : स्थानिक श्री मुनीश्वर महाराज मंदिरातील सूर्यनमस्काराला ४७ वर्षांची परंपरा आहे. स्व. देवराव लांभाडे गुरुजी या सूर्यनमस्काराला सुरुवात केली आणि नंतर त्याचे मंडळात रूपांतर झाले. काेराेना संक्रमण काळात या सूर्यनमस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हाेते. मात्र, मंडळातील सदस्यांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करीत ही परंपरा याही वर्षी कायम ठेवली. यावर्षी ११ हजार सूर्यनमस्कार करण्यात आले, अशी माहिती सूर्यनमस्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी दिली.

सावरगाव (ता. नरखेड) येथील श्री मुनीश्वर महाराज मंदिराच्या आवारात दरवर्षी पाैष महिन्यात सूर्यनमस्काराचे आयाेजन केले जाते. सूर्यनमस्काराचा हा कार्यक्रम सव्वा महिना सुरू असताे. ही परंपरा स्व.देवराव लांभाडे गुरुजी यांनी ४७ वर्षांपूर्वी सुरू केली हाेती. कालांतराने सूर्यनमस्कार करणाऱ्यांनी मंडळाची स्थापना केली. या मंडळातील सदस्य दरवर्षी ५१ हजार सूर्यनमस्कार करतात. यावर्षी काेराेना संक्रमणामुळे सूर्यनमस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हाेते.

ही परंपरा खंडित हाेऊ नये म्हणून यावर्षी ११ हजार सूर्यनमस्काराचा तसेच काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रथसप्तमीला (१९ फेब्रुवारी) सकाळी या सूर्यनमस्कार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता श्री मुनीश्वर महाराजांच्या समाधीस्थळाची पूजा करून सकाळी ६.३० वाजता सूर्यनमस्काराला सुरुवात झाली. ११ हजार सूर्यनमस्कार झाल्यानंतर उपस्थितांना दुधाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री मुनीश्वर महाराजांचा अभिषेक, पूजा व भजनाचा कार्यक्रम पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्यात आले हाेते, अशी माहिती सूर्यनमस्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी दिली.

Web Title: 47-year-old tradition of sun salutation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.