शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:34 IST

वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्दे२० आत्महत्या मदतीसाठी पात्र 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढविण्यासोबत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्जमाफीही देण्यात आली. त्यानंंतरही शेतकरी आत्महत्या होत आहे. वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.शेतकरी आत्महत्या हा राज्याला आणि त्यातही विदर्भाला लागलेला कलंक समजण्यात येतो. हा कलंक पुसण्यासाठी आतापर्यंत शासनाकडून अनेक उपययोजना करण्यात आल्या. परंतु या योजनांचा किती फायदा होतो, हा प्रश्नच आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचाही फारसा होत असल्याचे दिसत नाही. कर्जमाफीनंतर जवळपास सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ४४ आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. वर्ष २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २० शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर ९ प्रकरण प्रलंबित असून १८ प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. मदत निधी वाढीची घोषणा, अंमलबजावणी कधीमदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे एक लाख रुपये देण्यात येते. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकरी आत्महत्या मदतीची रक्कम पाच लाख रुपये करण्याची घोषणा सभागृहात केली होती. मात्र चार वर्ष होत असताना अद्याप त्यात वाढ करण्यात आली नाही, ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येणार हाही प्रश्नच आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर