शहरातील ४६० अतिक्रमणांचा झाला सफाया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:58+5:302021-02-06T04:14:58+5:30

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी शहरातील ४६० अतिक्रमणे हटवून ८ ट्रक सामान जप्त केले. कारवाईत अतिक्रमणधारकांकडून दंडही ...

460 encroachments cleared in the city () | शहरातील ४६० अतिक्रमणांचा झाला सफाया ()

शहरातील ४६० अतिक्रमणांचा झाला सफाया ()

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी शहरातील ४६० अतिक्रमणे हटवून ८ ट्रक सामान जप्त केले. कारवाईत अतिक्रमणधारकांकडून दंडही वसूल करण्यात आला.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जयताळा बाजार रोडवर ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पथकाने प्रतापनगर चौक ते जयताळा बाजारापर्यंत कारवाई करून अतिक्रमणधारकांचे १ ट्रक साहित्य जप्त केले. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारीच्या धारस्कर रोड, सिटी पोस्ट ऑफीसजवळील दिवाकर कावडे यांच्या जर्जर झालेल्या घराचा काही भाग तोडण्याची कारवाई केली. त्यानंतर गांधी पुतळा चौक ते नंगा पुतळा चौक, तीन नल चौकापर्यंत ५ ठेले जप्त करून ३५ अतिक्रमण हटविण्यात आली. दरम्यान, अतिक्रमणधारकांकडून १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत लोकमत चौक ते रामदासपेठ, काचीपुरा चौक, बजाजनगर चौक ते काचीपुरापर्यंत २४ अतिक्रमणे हटविण्यात आली. विष्णुजी की रसोई समोरील ४ ठेले जप्त करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत मानेवाडा चौक ते उदयनगर चौक, म्हाळगीनगर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुटपाथवरील ४५ अतिक्रमणे हटविण्यात आली. या मार्गावर अतिक्रमणधारकांकडून ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत आग्याराम देवी चौक ते शुक्रवारी तलाव, गणेशपेठ बसस्थानक ते मोक्षधाम घाट चौकापर्यंत ६५ अतिक्रमणे हटवून २४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर झोन अंतर्गत ईश्वरनगर चौकात अनधिकृत ३ दुकानांचे शेड तोडण्यात आले. याबाबत नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ऑनलाईन तक्रार केली होती. त्यानंतर न्यू नंदनवन कॉलनी परिसरात एक धार्मिक प्रतिमा हटविण्यात आली. केडीके कॉलेज ते मंगलमूर्ती चौकापर्यंत ५६ अतिक्रमणे हटवून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक ते कांजी हाऊस चौक, वीटभट्टी चौक ते दही बाजार पुलापर्यंत ठेले आणि दुकानांसह ५२ अतिक्रमण हटविण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत छापरूनगर चौक ते कुंभारटोली, शिवाजी चौक ते वर्धमाननगर आणि आंबेडकर चौकापर्यंत फुटपाथवरील ५२ अतिक्रमण हटवून २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आसीनगर झोन अंतर्गत विनोबा भावे नगरात एका कॅरम क्लबचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर इंदोरा चौक ते कमाल चौकापर्यंत कारवाई करून अतिक्रमणधारकांकडून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत गिट्टीखदान चौक ते बोरगाव चौक आणि अवस्थीनगर चौकापर्यंतचे ५६ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, अतिक्रमणधारकांकडून ९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने केली.

............

Web Title: 460 encroachments cleared in the city ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.