शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चेन पुलिंग करून उतरविल्या बीअरच्या ४५३ बॉटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:23 IST

आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल्या. परंतु आरपीएफची चमू घटनास्थळी पोहोचल्यामुळे आरोपी उतरविलेली दारू घटनास्थळी सोडून फरार झाले.

ठळक मुद्देआरोपी फरार : काजीपेठ-अजनी पॅसेंजरमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल्या. परंतु आरपीएफची चमू घटनास्थळी पोहोचल्यामुळे आरोपी उतरविलेली दारू घटनास्थळी सोडून फरार झाले.गुरुवारी रेल्वेगाडी क्रमांक ५७१३६ काजीपेठ-अजनी पॅसेंजरमध्ये सकाळी १०.४५ वाजता बोरखेडी-बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून गाडी थांबविण्यात आली. ते बीअरच्या बाटल्या असलेले पोते खाली उतरवीत असताना गाडीचा गार्ड बी. जे. राजपूत याने याची सूचना आरपीएफचे उपनिरीक्षक संजय सिंह, मनोज कुमार यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता १९ पोत्यात बीअरच्या बॉटल्स आढळल्या. परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. घटनेची माहिती अजनीचे निरीक्षक निर्मल टोपो यांना देण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक आर. के. राम आणि जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. दुसºया घटनेत दुपारी ३.३५ वाजता आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, आर. के. त्रिपाठी, विकास शर्मा, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर गस्त घालत असताना त्यांना एक पांढºया रंगाचे पोते बेवारस स्थितीत आढळले. आजूबाजूच्या प्रवाशांनी पोत्यावर आपला हक्क न सांगितल्यामुळे संशयाच्या आधारे पोत्याची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,१६२ रुपये किमतीच्या ५१ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली. दोन्ही कारवाया आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

 

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी