शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावणेपाच कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:09 IST

११ वर्षांपासून चर्चेत असलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी काही बिल्डर आणि सनदी लेखापाल (सीए) यांची प्रदीर्घ चौकशी केली. या घडामोडीमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त जमिनीचा सौदा : सीए, बिल्डरची गुन्हे शाखेत चौकशी : संबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ वर्षांपासून चर्चेत असलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी काही बिल्डर आणि सनदी लेखापाल (सीए) यांची प्रदीर्घ चौकशी केली. या घडामोडीमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.प्रकरण शंकरपूर तसेच तत्पूर्वी दाखविण्यात आलेल्या एका जमिनीच्या बनवाबनवीचे आहे. गजानन धाम सहकार नगर येथील रहिवासी सारंग राऊत यांनी गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना धंतोलीतील गणेश बिल्डर्स लि. चे संचालक नारायण चंडीराम डेमले (सीए), अतुल नारायण डेमले, पहलाज सच्यानी, विजय रामानी, ओम सच्यानी, गौरीशंकर सच्यानी, नानक सोनी आणि मनोज अनकंठवार आदींनी राऊत यांना एक जमीन दाखवली होती. ही जमीन पाच कोटी रुपयात विकत घेण्याचा सौदा राऊत यांनी केला होता. दीड कोटी रुपये अग्रीम दिल्यानंतर करारपत्र झाले. त्या करारपत्रात जमिनीची चतु:सिमा भलतीच दिसत असल्याने राऊत यांनी आक्षेप घेतला. हा सौदा वांद्यात आल्यानंतर गणेश बिल्डर्सचे संचालक पहलाज सच्यानी आणि अतुल डेमले तसेच त्यांच्या साथीदारांनी राऊत यांना कसेबसे शांत करून शंकरपूरला मोक्याची जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर राऊत यांना २ कोटी, १० लाख रुपये मागितले. २० आॅगस्ट २००८ ला नव्याने करारपत्र झाले. त्यानंतर या जमिनीचा सौदाही वादग्रस्त असल्याचे राऊत यांच्या लक्षात आले. सच्यानी आणि डेमलेने तोपर्यंत राऊत यांच्याकडून एकूण ४ कोटी, ८० लाख रुपये घेतले होते. सौदा वादग्रस्त असल्यामुळे राऊत यांनी आपली रक्कम परत मागितली. मात्र, त्यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर राऊत यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे वाद वाढला. परिणामी राऊत यांनी गणेश बिल्डर्स लि.चे संचालक नारायण डेमले, अतुल नारायण डेमले, पहलाज सच्यानी, विजय रामानी, ओम सच्यानी, गौरीशंकर सच्यानी, नानक सोनी आणि मनोज अनकंठवार यांच्याविरोधात गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदवली.या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन घडामोडीमुळे पोलीस स्वस्थ होते. नुकतीच या प्रकरणाशी संबंधित गैरअर्जदाराची अटकपूर्व जामीन याचिका रद्द झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत सनदी लेखापाल नारायण डेमले, बिल्डर पहलाज सच्यानी आणि त्यांच्या काही साथीदारांना शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यांची प्रदीर्घ चौकशी झाल्याने शहरातील सनदी लेखापाल तसेच बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडाली.चौकशी सुरू आहे...या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रकरण कोट्यवधीच्या फसवणुकीचे आहे. त्यामुळे सखोल चौकशी सुरू आहे. सीए आणि बिल्डरांना आम्ही चौकशीसाठी बोलविले. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर