शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 12:46 IST

'एचडीएफसी' बँकेत व्यवस्थापक असल्याची बतावणी

नागपूर : 'एचडीएफसी बँकेत करत एका महिलेने तिचा भाऊ व इतर साथीदारांसह दिव्यांग महिला तसेच तिच्या नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा घातला. पाच वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल असे त्यांनी आमिष दाखविले होते. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माया शंभरकर (४८, राजगृहनगर) या दिव्यांग असून त्यांची नवनीत कैलाश गजभिये (३५, कपिलनगर) याच्याशी भेट झाली. त्याने त्याची बहिण प्रियदर्शनी गजभिये (३८, कपिलनगर) व तिचा पती एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगितले. माया यांच्या कुटुंबियांकडे पैसे असल्याची माहिती त्याने काढली होती. दिव्यांगांसाठी बँकेकडून विशेष गुंतवणूक योजना असून त्यात पाच वर्षांत दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले.

त्याने २९ एप्रिल २०१७ ते ९ मे २०२२ या दरम्यान माया व त्यांची बहीण तसेच इतर नातेवाईकांकडून वेळोवेळी मुदतठेवीच्या नावाखाली ४५ लाख रुपये घेतले. त्याने त्यांना एचडीएफसी बँकेचे मुदतठेवीचे बनावट प्रमाणपत्र व इतर कागदपत्रेदेखील दिली. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही. पाच वर्ष झाल्यानंतर मुदतठेवीची सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbankबँकnagpurनागपूर