राज्यात चार महिन्यांत ४३२१ वणव्यांचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:20 AM2021-02-27T11:20:24+5:302021-02-27T11:21:58+5:30

Nagpur News देशात लागणाऱ्या जंगलाच्या आगीमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4321 wildfires erupt in the state in four months | राज्यात चार महिन्यांत ४३२१ वणव्यांचा भडका

राज्यात चार महिन्यांत ४३२१ वणव्यांचा भडका

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावरविदर्भ सर्वाधिक वणवा प्रवण पाॅइंट

निशांत वानखेडे

नागपूर : वर्ष २०२०-२१ मध्ये देशात १ लाख १७ हजार १९० वणव्यांच्या नाेंदी करण्यात आल्या. देशात लागणाऱ्या जंगलाच्या आगीमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यात लहान-माेठ्या ११२८९ वणव्यांच्या नाेंदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांत म्हणजेच १ नाेव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत राज्यात ४३२१ वणव्यांचे अलर्ट विभागाला मिळाले हाेते आणि यातही उत्तराखंड व मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जंगलात लागणारे वणवे हे वनक्षेत्राच्या नुकसानीचे सर्वांत माेठे कारण आहे. प्राणी आणि वनस्पतींसह एकूणच जैवविविधतेवर त्याचा परिणाम हाेताे. त्यामुळे वन अग्नी नियंत्रण व व्यवस्थापन हे वनविभागासमाेर माेठे आव्हान ठरले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलात आग लागण्याचा धाेका वाढताे. फेब्रुवारी महिन्यात ती स्थिती दिसायला लागली आहे. वणव्यांची अचूक आणि रिअल टाइम माहिती मिळविण्यासाठी भारतीय वन्य सर्वेक्षण विभागाने नासाच्या टेरा आणि ऍक्वा सॅटेलाइटच्या मदतीने ‘एसएनपीपी’ आणि ‘माेडिस’ या पद्धती स्वीकारल्या आहेत. याद्वारे दिवसातून सहा वेळा वन खात्याला अलर्ट प्राप्त हाेत असताे. यातही एसएनपीपी पद्धत प्रभावी ठरत असून देशातील १० महत्त्वाच्या राज्यातील रिअल टाइल अलर्ट मिळविण्यात यश आले आहे.

याच पद्धतीच्या आधारे देशात वणव्यांचे अलर्ट मिळत आहेत. गेल्या चार महिन्यांत देशभरात ३६,७८५ वणवे लागले हाेते. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये वाढ नाेंदविण्यात आली असून एकाच महिन्यात २१५६५ वन अग्नी भडकल्याच्या नाेंदी आहेत. माेडिस पद्धतीने हा आकडा ४६१६ एवढा आहे. नाेव्हेंबर २०२० मध्ये २७८०, डिसेंबरमध्ये ५०७८ व जानेवारी २०२१ मध्ये ७३६३ वणवे लागल्याची नाेंद आहे. महाराष्ट्रात केवळ गेल्या ७ दिवसांत जंगलात ७३३ आगी लागल्याची नाेंद करण्यात आली आहे. शुक्रवारी एका दिवसात राज्यात ११ ठिकाणी वनाग्नी भडकल्याचे यात नमूद आहे.

महाराष्ट्रात २६ हजार चाै. किमी क्षेत्र वणवा प्रवण

राज्यात वणव्याबाबत १८२१.५१ चाैरस किमी क्षेत्र अतिसंवेदनशील आहे. २१३५ चाै. किमी व्हेरी हाय, ९१९१ चाै. किमी. हाय फायर प्रवण, तर १२९०३ चाै. किमी वनक्षेत्र मध्यम वणवा प्रवण आहे. म्हणजे ३९ टक्के वनक्षेत्र वणवा प्रवण आहे. यातही अतिसंवेदनशील क्षेत्रात विदर्भातील वनक्षेत्राचा समावेश हाेताे.

Web Title: 4321 wildfires erupt in the state in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग