शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!

By योगेश पांडे | Updated: April 1, 2024 10:59 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत.

- योगेश पांडे नागपूर -  देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ २७ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, ४३ टक्के उमेदवार बीपीएल गटातील आहेत. 

‘लोकमत’ने सर्व उमेदवारांच्या शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सर्वच पक्ष व अपक्ष मिळून नागपूर मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत उत्पन्नाची टक्केवारी काढली असता ७ म्हणजेच २७ टक्के उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते, हे विशेष. २०१९च्या निवडणुकीत हाच आकडा १५ टक्के इतका होता. सर्वाधिक कोट्यधीश नोंदणीकृत पक्षांमध्ये असून, तीन अपक्ष कोट्यधीश आहेत. तीन उमेदवारांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नसल्याचे नमूद आहे.

२६ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न शून्य- तब्बल ४३ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख किंवा त्याहून कमी आहे. त्यातील सात उमेदवारांनी तर त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शून्य असल्याचे दर्शविले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये आहे तर मग त्यांचा चरितार्थ चालतो तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- नागपूर मतदारसंघातून ११ अपक्ष रिंगणात आहेत. यातील तीन अपक्ष उमेदवार कोट्यधीश आहेत. 

उमेदवारांची एकूण मालमत्तामालमत्ता    उमेदवारांची संख्या१ लाखाहून कमी    ६१ लाख ते १० लाख    २१० लाख ते २५ लाख    ३२५ लाख ते ५० लाख    ३५० लाख ते १ कोटी    ५एक कोटीहून अधिक    ५दहा कोटींहून अधिक    २

उमेदवारांचे वार्षिक उत्पन्नवार्षिक उत्पन्न    उमेदवारांची संख्याशून्य    ७एक लाखांहून कमी    ४१ लाख ते ५ लाख    ६५ लाख ते १० लाख    ४१० लाख ते २५ लाख    ३२५ लाख ते ५० लाख    ०५० लाखांहून अधिक    २

२३ टक्के उमेदवारांची मालमत्ता एक लाखांहून कमी  नागपूर मतदारसंघातील २३ टक्के उमेदवारांची एकूण मालमत्ता १ लाखांहून कमी आहे. तर ७.७० टक्के उमेदवारांची मालमत्ता १ लाख ते १० लाख यांच्या दरम्यान आहे. ११.५४ टक्के उमेदवारांकडील एकूण मालमत्ता १० लाख ते २५ लाख यांच्या दरम्यान आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरnagpur-pcनागपूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४