ट्रान्सपोर्टरच्या खात्यातून ४.२१ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST2021-04-08T04:09:37+5:302021-04-08T04:09:37+5:30

फावड्याने मुलावर हल्ला नागपूर : यशोधरानगर येथे एका युवकाला वडिलांनी फावड्याने मारून जखमी केले. लक्ष्मण कामखे (६५, रा. इंदिरा ...

4.21 lakh lamps from transporter's account | ट्रान्सपोर्टरच्या खात्यातून ४.२१ लाख लंपास

ट्रान्सपोर्टरच्या खात्यातून ४.२१ लाख लंपास

फावड्याने मुलावर हल्ला

नागपूर : यशोधरानगर येथे एका युवकाला वडिलांनी फावड्याने मारून जखमी केले. लक्ष्मण कामखे (६५, रा. इंदिरा मातानगर) असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मणचा पत्नीसोबत नेहमीच वाद होत होता. मुलगा शशिपाल वडिलांना रोखायचा. यामुळे लक्ष्मण संतापला होता. मंगळवारी रात्री २.३० वाजता शशिपाल घरी झोपला होता. त्याचवेळी लक्ष्मणने फावड्याने त्याच्यावर वार केला. डोक्यावर व हातावर वार करून त्याला जखमी केले. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

-----------------

कल्लू यादववर एमपीडीए

नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड सूरज ऊर्फ कल्लू ओमप्रकाश यादव याला एमपीडीएअंतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. जोशीवाडी, कुकडे ले-आउट येथील २४ वर्षीय कल्लूच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, दंगा, मारहाण आदी गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधित कारवाई केल्यानंतरही त्याने त्याचे कृत्य थांबवले नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली. त्याला पुणे येथील येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.

Web Title: 4.21 lakh lamps from transporter's account