शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आॅस्ट्रेलियन दूतावासातील कार विक्रीचे आमीष दाखवून ४.२० लाखाने फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:22 IST

आॅस्ट्रेलियन दूतावास (चेन्नई) येथील कार्यालयातील इर्म्पोटेड अ‍ॅम्बेसेडर कार विकण्याचे आमीष दाखवून नागपुरातील एका व्यापाऱ्याला ४.२० लाख रुपयाने फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देटोळीत महिला वकील ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅस्ट्रेलियन दूतावास (चेन्नई) येथील कार्यालयातील इर्म्पोटेड अ‍ॅम्बेसेडर कार विकण्याचे आमीष दाखवून नागपुरातील एका व्यापाऱ्याला ४.२० लाख रुपयाने फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चेली (बोगस नाव) शब्बीर सय्यद, इर्शाद अली, अ‍ॅड. प्रीती अशी आरोपींची नावे आहे. हर्ष ओमप्रकाश अग्रवाल (४१) असे फिर्यादीचे नाव आहे. गेल्या ३० आॅगस्ट रोजी अग्रवाल यांच्या मोबाईलवर चेली नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने फोनवर सांगितले की, रोयापेठ चेन्नई येथील आॅस्ट्रेलियन दूतावास कार्यालयाची इर्म्पोटेड कार कमी किमतीत विकायची असल्याची माहिती दिली. अग्रवाल यांना ई-मेल आयडी पाठवल्यास कारच्या मॉडेलचे फोटो व डिटेल्स माहिती पाठवण्याचे आश्वासन दिले. तेव्हा अग्रवाल यांनी चेलीला मेल आयडी पाठवला. आरोपी महिला प्रीती मॅडम यांच्या नावाने नितीन कुमारने मेल व अग्रवाल यांना इम्पोर्टेड कारचे फोटो आणि किमतीची माहिती दिली. अग्रवाल यांना कार पसंद आली यासाठी आरोपींनी अग्रवाल यांना मूळ किमतीच्या १० टक्के रक्कम अग्रिम म्हणून बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अग्रवाल यांनी १ लाख ८० हजार आणि ४ सप्टेंबर रोजी २ लाख ४० हजार रुपये आॅस्ट्रेलियन दूतावास (चेन्नई) खासगी सचिव यांच्या बोगस अकाऊंटवर जमा केले. यानंतर दोन-तीन दिवस संबंधितांकडून कुठलाही संपर्क होत नसल्याने अग्रवाल स्वत: चेन्नईला पोहोचले. तिथे दूतावास कार्यालयात चेली नावाच्या व्यक्तीची खूप वर्षाअगोदर आॅस्ट्रेलियात बदली झाल्याचे आणि इतर नावाची कुठलीही व्यक्ती कार्यालयात कार्यरत नसल्याची माहिती मिंळाली. यानंतर अग्रवाल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वर्धमाननगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेतून आरोपींच्या खाते क्रमांक २०३७३७१६५८७ व ३७७८९५०३५८० मध्ये ४ लाख २० हजार रुपयांची रक्कम जमा केली होती.सायबर सेलने केला तपासफिर्यादी अग्रवाल यांनी फसवणुकीची लिखित तक्रार सायबर गुन्हे शाखेकडे केली. सायबर सेलच्या चमूने तपास केला असता ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले, ते खाते शब्बीर सय्यद, इर्शाद अली आणि मेल आयडी नितीनकुमार यांच्या नावाने असल्याचे उघडकीस आले. या रकमेचे ट्रान्झेक्शन वर्धमाननगरस्थित बँक शाखेतून करण्यात आल्याने प्रकरण लकडगंज पोलीस ठाण्यात रेफर करण्यात आले. लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी