शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४१५ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:58 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोच क्रमांक सीआर १५४३० मध्ये प्लास्टिकचे दोन पोते संशयास्पद स्थितीत आढळले. त्यात मध्य प्रदेशातील दारूच्या ४१५ बॉटल होत्या. परंतु मुंबई ते नागपूर प्रवासात मध्य प्रदेशातील दारू मिळत असलेले कोणतेच गाव नसून मुंबई मार्गे नागपुरात दारू कशी आणली जाईल हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दररोज नागपुरातून वर्धा, चंद्रपूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात दारूची तस्करी होते. पहिल्यांदा दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातून नागपुरात दारू आल्याची घटना घडली आहे.कारवाई आश्चर्यचकित करणारीआयआरसीटीसीच्या वेळापत्रकानुसार सेवाग्राम एक्स्प्रेस नागपुरात पोहोचण्याची वेळ सकाळी ६.१० वाजताची आहे. ही गाडी १.५७ तास उशिराने सकाळी ८.०७ वाजता नागपुरात पोहोचली. आरपीएफने कारवाईची वेळ ८.२० वाजता दाखविली आहे. गाडी येताच १३ मिनिटात आरपीएफचे जवान दारूच्या तस्करीची शक्यताच नसलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोचपर्यंत गेलेच कसे हा प्रश्न आहे. तो पर्यंत गाडीतील प्रवासीच खाली उतरले नसतील. याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ही कारवाई बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा तपास करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी