४०.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:35+5:302021-01-08T04:24:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : पाेलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी उचल व वाहतूक करणाऱ्या ...

४०.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : पाेलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी उचल व वाहतूक करणाऱ्या टिप्परसह दाेन ट्रॅक्टर पकडले. त्यात पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ४० लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये ट्रॅक्टरचालक नीलेश कचरू सुरजुसे (२६), मालक मुकेश पावडे (४०), ट्रॅक्टरचालक जगदीश रमेश माराेतकर (३२), मालक ज्ञानेश्वर गुलाब सुरकर (४०) चाैघेही रा. खापा, ता. सावनेर व टिप्परचालक सागर संताेष सहारे (२३, रा. काेराडी, ता. कामठी) व मालक सचिन प्रभाकर येणूरकर (३३, रा. नागपूर) या सहा जणांचा समावेश आहे. खापा परिसरातील रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी पाेलिसांनी बावनगाव शिवारात धाट टाकली. यात त्यांनी एमएच-४०/वाय-४४६४ क्रमांकाचा टिप्पर व पाच ब्रास रेती असा एकूण २० लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पाेलिसांनी दुसरी कारवाई शिवधाम-वर्गा राेडवर केली. यात त्यांनी एमएच-४०/ए-६११३ क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबवून झाडती घेतली. त्यात विना राॅयल्टी रेतीची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट हाेताच १० लाखाचा ट्रॅक्टर व तीन हजार रुपयांची रेती जप्त केली. त्यानंतर पाेलिसांनी याच भागात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. त्याही ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत रेती असल्याने तसेच ती विना राॅयल्टी असल्याने पाेलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला. यात त्यांनी १० लाखाचा ट्रॅक्टर व तीन हजार रुपयांची रेती असा एकूण १० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही कारवाईमध्ये एकूण ४० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. या तिन्ही प्रकरणात खापा पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनांचा तपास ठाणेदार अजय मानकर करीत आहेत.