४०० अतिक्रमण हटविले, आठ ट्रक सामान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:01+5:302021-02-05T04:48:01+5:30

लक्ष्मीनगर झाेनअंतर्गत आयटी पार्कराेडवरील फूटपाथवरील चायनीज ठेले, भाजी व ज्यूस विक्रेत्यांची ठेले हटविण्यात आले. पाच ठेले जप्त करण्यात आले. ...

400 encroachments removed, eight trucks confiscated | ४०० अतिक्रमण हटविले, आठ ट्रक सामान जप्त

४०० अतिक्रमण हटविले, आठ ट्रक सामान जप्त

लक्ष्मीनगर झाेनअंतर्गत आयटी पार्कराेडवरील फूटपाथवरील चायनीज ठेले, भाजी व ज्यूस विक्रेत्यांची ठेले हटविण्यात आले. पाच ठेले जप्त करण्यात आले. यानंतर काॅंग्रसेनगरमध्ये एका इमारतीचे अवैध स्लॅब ताेडण्याची कारवाइ करण्यात आली. धरमपेठ झाेनअंतर्गत गिट्टीखदान पाेलीस स्टेशन ते फ्रेन्ड्स काॅलनीपर्यंत ३६ अतिक्रमण हटविण्यात आले. या मार्गावर फूटपाथवरील २० शेड ताेडण्यात आले. एक ठेला, ३ बाेर्डसह एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी पथकाने १० हजार रुपये दंडही वसूल केला. हनुमाननगर झाेनच्या मानेवाडा राेडपासून ओंकारनगर चाैक व बेसा मार्गावर ४७ अतिक्रमण हटविण्यात आले. नेहरूनगर झाेनच्या गुरुदेवनगर ते इश्वरनगर चाैक, केडीके काॅलेज ते जगनाडे चाैकपर्यंत ४६ अतिक्रमण हटविले. सतरंजीपुरा झाेनच्या राणी दुर्गावती चाैक ते कांजी हाऊस चाैक, इटा भट्टी चाैक ते शांतिनगर घाटपर्यंत ५२ अतिक्रमण हटविण्यात आले. या मार्गावर अतिक्रमणधारकांकडून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. आसीनगर झाेनअंतर्गत इंदाेरा चाैक ते कमाल चाैक, आवळे बाबू चाैकवर फळ विक्रेत्यांवर कारवाइ करण्यात आली. या मार्गावर ५५ अतिक्रमण हटविण्यात आले व ट्रकभर सामानही जप्त करण्यात आले. मंगळवारी झाेनमध्ये रिलायन्स पेट्राेल पंपापासून अवस्थीनगर चाैकापर्यंत ठेले जप्त करण्यात आले. यानंतर जाफरनगर नाल्यावरील आरबी रेस्टाॅरंटचे अनधिकृत बांधकाम ताेडण्यात आले. गाेंडवाना चाैक, इटारसी पुल, जरीपटक राेड ते दयानंद पार्कपर्यंत कारवाइ करून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: 400 encroachments removed, eight trucks confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.